जय जय जय जय श्रीनवनाथ
चरणशरण, मज दावा वाट!ध्रु.
चरणशरण, मज दावा वाट!ध्रु.
ओवी ओवी विवरावी, भक्ति आतुनी उमलावी
पोथी आवडती व्हावी, जीवनयुक्ती उमजावी
भावभक्तिने जुळले हात!१
अभ्यासा मज बसवावे, गीत गाउनी रमवावे
अवघड ते सोपे व्हावे बोधामृत नित सेवावे
उष:काल तो व्हावा आत!२
का वेडे मन बावरते आत्मानंदा का मुकते
इंद्रियभोगा का भुलते कळले तरि का नच वळते
तुम्ही सावरा धरूनी हात!३
धीर धरी जो सुजाण तो, हसतमुख सदा योगी तो
तनी ना कधी गुंते तो, मने मोकळा स्वतंत्र तो
अनाथ ना कुणि सर्व सनाथ!४
निश्चय झाला आत्म्याचा प्रत्यय आला आत्म्याच्या
शिष्य नसे लेचापेचा, ठाम उभा ठाकायाचा
भिरकावुन द्यावी खंत!५
चिंतन भक्ता बोलवते चिंता पुरती संपवते
भीती सगळी घालवते सुहास्य वदनी आणवते
नवनाथांचा हाच प्रसाद!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.१०.१९८९/१२.१०.२००१
No comments:
Post a Comment