Wednesday, December 23, 2020

सावधान हिंदु हो! सावधान बंधु हो!

सावधान हिंदु हो! सावधान बंधु हो!ध्रु

हाच देश कर्मभूमि पितृभूमि आपुली
पुण्यभूमि हाच देश - भावभक्ति या स्थली
ठेवुनी रुजवुनी, राष्ट्रीयत्व स्थापु हो!१

दास्य नाश व्हावया शस्त्रसज्ज होउ या
अजिंक्य देश व्हावया नित्य दक्ष राहु या
जातिभेद गाडुनी अभंग संघ होउ हो!२

विश्वराज्य व्हायचे दूर ध्येय राहिले
अजिंक्य राष्ट्र व्हायचे मनात हेच बाणले
शत्रुमनी सामर्थ्ये धाक निर्मु या हो!३

हिंदु आम्ही! जाणिव ही स्फूर्ति देत राही
बंध कोवळा जनांस बांधण्यास पाही
हिंदुत्वच शक्तिबीज विस्मरू नका हो!४

स्वार्थ हिंदुजातिचा स्वार्थ मातृभूमिचा
घात हिंदुजातिचा घात मातृभूमिचा
शत्रुरात्रि ही असे दक्ष राह्यचे हो!५

हिंदु नाव टाकणे आत्मघात साधणे
हिंदु नाव गर्जणे वज्रशक्ति जोडणे
मूळ झरा स्फूर्तीचा आटवू नका हो!६

एकजूट हो अभेद्य पृथ्विमोल ठेवा
हिंदु हिंदु जोडणे हीच ईशसेवा
संघशक्ति प्राणवायु राष्ट्रजीवनी हो!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

३०.०५.१९७३

जन्मणे न तुझिया हाती

जन्मणे न तुझिया हाती, घात व्यर्थ करशी
वेड्या खंत का जिवासी? ध्रु.

सोड ही अहंता वेड्या विवेकास जाग
विकारी न होई जीवा विचारेच वाग
परीक्षा न देता घोर यशा वांच्छितोसी!१

मरायचे आहे तर का करशि आत्मघात
मारुनी रिपुला मरुनी अमर हो जगात
आत्मघात भ्याडपणाचा का न मानतोसी?२

दुर्बलता सोड मनाची जाण तू अनंत
नको खेद मानू कसला नको करू खंत
एक एक पार्था हृदयी वसे हृषीकेशी!३

अफाट या विश्वामाजी अणुहुनी सान
पसाऱ्यात या विश्वाच्या कुठे तुझे स्थान
जरी मरशि विश्व न अडते ध्यानि का न घेसी!४

विवेके मनाचा अपुल्या तोल सावरावा
रामकृष्ण जाता येता मनी आठवावा
गीत मधुर भगवंताचे कधी ऐकशी?५

फलाची न धरता इच्छा आचरी स्वधर्मा
देहमंदिरी वसणाऱ्या पहा प्रभू रामा
तुझी तुला ओळख पटता मिळे सौख्यराशी!६

खरी कसोटी तव येथे सुरू ठेव सेवा
कर्मफले अर्पुनि मनुजा तुष्ट करी देवा
आचरूनि गीता दिव्या बोध दे जगासी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

१९.०५.१९७३

Saturday, December 5, 2020

योगिराज अरविंद जय जय!

योगिराज अरविंद जय जय!
भक्तराज अरविंद! ध्रु.

अथांग सागरसम जीवन
किती करावे मी अवगाहन
दृश्याहुनि अदृश्य किती तरी
चरित तुझे अरविंद!१

बोलविता धनी देव मानसी
जीवनसूत्रे तया निरविशी
तुझी अलौकिक योगसाधना 
तू ज्ञानसुखाचा कंद!२

अज्ञानाचे बंध सुटावे
मृत्युपलिकडे नरा दिसावे
सतत स्मरणे प्रसन्नचित्ते
आळविलासि मुकुंद !३

जन्मच अवघा कल्पुनि साधन
घडेल जगती नर नारायण
दिव्य जीवनी परिणति व्हावी
ऐसा धरला छंद!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
यमन कल्याण 
ताल धुमाळी

Thursday, November 26, 2020

माउलीचा हरिपाठ


माउलीचा हरिपाठ
विठ्ठलाला देत वीट
हरि हरि म्हणताना
संसार ही घडे नीट १

माऊलीची शिकवण
हरि मुखे म्हण म्हण
होशी मोकळा आतून
बंध जातात सुटून २

माऊलीचा सहवास
घर होतसे आळंदी
माझे तुझे सारे संपे
जो तो एकमेका वंदी ३

माऊलीचा जो जिव्हाळा
भाग्यवंतास लाभला
ज्ञाना स्वये देव झाला
ओवी ओवीत दिसला ४

माऊलीचा हा प्रसाद
बळे लिहाया बसवी
गाई एक तरी ओवी
जवळीक अनुभवी ५

ज्ञाना आपण विठ्ठल
शांत सुस्थिर वत्सल
हरिपाठ जे सांगेल
हरि साधका करील ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.७.२००३

Sunday, November 15, 2020

हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे

कळलेली आम्हा मृत्युतिथी आधीच
गुंडाळुन गाशा सिद्ध मित्र केव्हाच
वध तुमचा करता वैरभाव नच चित्ती 
ती अटळच घटना भाळी लिहिली होती
अपकीर्ती होवो सूखेनैव, दोघांचे -
हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे !१

हा खंडित भारत पुनरपि व्हावा एक
जय हिंदुराष्ट्र घनगर्जन करि प्रत्येक
हा मंगल प्रातःसमय बोलवत आहे
यमराज भेटिची ओढ वाढते आहे
हे पुष्पहार नच दोरखंड फासाचे
हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे !२

शासनार्ह दोघे यात न शंका काही
म्हणूनीच क्षमेची मनी अपेक्षा नाही
बलिदान घडे बहुमान, देह हे समिधा
हा देश कृष्ण तर आम्ही दोघे राधा
सिंधूत पडो मम रक्षा स्वप्न मनीचे
हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे !३

Wednesday, November 11, 2020

दीपज्योतीस

दीपशिखे तू जळत रहा
तव प्रकाशी मना जाणवो 
ज्वलनांतरिही शीतलता ! ध्रु.

नाचत नाचत उजळ मुखश्री
मनामनातील फुलव वनश्री
'जीवन अपुले दुसऱ्यासाठी'
घोष अंतरी घुमो महा!१

मंद तेवुनी चिंतन शिकवी
आत्मबोधनी वृत्ति रंगवी
स्वतेजाने मना उजळुनी
ईशचरणि अंजली वहा!२

तुझ्या गुणांची प्रभुला पारख
तव जळण्याचे तयास कौतुक
पूजाद्रव्यी तुला लाभले
स्थान अलौकिक, जळत रहा!३

द्वैतभावना उरली नाही
मी विश्वाते व्यापुनि राही
मदंतरी क्षण डोकावुनि तू
तुझेच अक्षय रूप पहा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीतादर्शन - मार्च १९७०)

Sunday, November 1, 2020

अवचित रामायण स्फुरले

क्रौंचमिथुन प्रणयात रंगता
सशर थांबला व्याध मागुता
शर लागुनिया नर कोसळता
मुनिवर कळवळले, रामायण स्फुरले!

रुद्ध गळ्यातुन उमटत ना स्वर
अश्रुसरी ओघळल्या सरसर
शरीर अवघे कापे थरथर
मना न राहवले, रामायण स्फुरले !

दोन जिवांची करुण कहाणी
चित्रित करता नयनी पाणी
क्रौंचवधाची अमर निशाणी
शब्दशिल्प सजले, रामायण स्फुरले !
अवचित रामायण स्फुरले!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 25, 2020

संघे भवतु मे श्रद्धा ..

संघो रूपं गणेशस्य 
संघं चिन्तय सर्वदा ।
संघेन वर्धते शक्तिः 
संघाय तस्मै नमः ।।  १ ।।

संघात् संजायते युक्तिः 
संघस्य युवको भव
'संघे भवतु मे श्रद्धा' 
भो संघं मां पालय ।। २ ।।

अर्थ : 

संघ हे समष्टिरूप गणेशच अशा संघस्वरूपाचे तू चिंतन कर.  संघामुळेच (कायिक, मानसिक, आत्मिक) बळ वाढते. अशा संघाला नमस्कार असो. 

संघामधूनच जगण्याची कला (युक्ती) उत्पन्न होते. तू संघाचा स्वयंसेवक हो. 'माझी श्रद्धा संघावरच असो' असे तुला वाटू दे.  हे संघरूप  भगवंता तू माझे रक्षण कर संवर्धन कर. 
 
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 



Sunday, October 18, 2020

गाऊ या, ध्याऊ या, अंबेजोगाईची योगेश्वरी

गाऊ या, ध्याऊ या, अंबेजोगाईची योगेश्वरी !ध्रु.

शब्द लेखणीतुन आले, आनंदाने मन डोले
घुमू लागला नाद अंतरी, गाली अश्रूसरी!१

मार्गशीर्ष पौर्णिमा येतसे, माहेराला मन धावतसे
गती लाभली चरणांलागी, उठे तनी शिरशिरी!२

खड्ग पात्र मुसळासह नांगर, करी शोभती किती शुभंकर 
मनोहारिणी, प्रलयकारिणी अवतरली भूवरी !३

कविता स्फुरली गाता गाता, परदयाळू आंबामाता
अमूर्त जी ती समूर्त झाली अपुली योगेश्वरी !४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१०.२००६

Saturday, October 17, 2020

जय माताजी

।। जय माताजी।।

तुझ्या दारी आलो   माते रेणुके
पाखर तू धरी         आम्हांवरी १
सकाळी सकाळी   ओढ लागे जीवा
वळती पावले         येथे येण्या २
जी जी सुखदुःखे     कोंदली मनात
येती ती ओठात      आपोआप ३
अदृश्य तो हात       फिरे पाठीवर
वाढतसे धीर          अधीराचा ४
दुःखे सरतील        सुखे भेटतील
विश्वास मनाचा      बळावतो ५
तुझ्या दर्शनाने       हुरूप वाढतो
उत्साह साठतो      अंतरात ६
माते रेणुके गे         सातही दिवस
आणव पायाशी     आस साधी ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके माऊली कृपेची सावली
वत्सासी गाउली तैसी आम्हां १
आले नवरात्र जागवले तूच
तूच सुचविले लिही काही २
काय चुका झाल्या मनाशी विचार
सुधार आचार येथुनी तू ३
उतावीळ मन तेणे अविचार
नामे सुविचार सुचतील ४
सारेच आपले दुजे कोण येथे?
मीच येथे तेथे पाहा मला ५
कन्या पत्नी सून माझीच ती रूपे
भेद नच खपे अणुमात्र ६
दुरावा संपव उचल पाऊल
मीहि दे चाहूल ऐक बाळा ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१७.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके रेणुके दयाळे अंबिके
बाहतो कौतुके येई वेगे १
पूस पदराने कोमेजले मुख
देई प्रेमसुख माय माझे २
नाते न आताचे कितीक जन्माचे
म्हणोनिया वाचे स्फुरे नाम ३
लाविलास लळा गाता झाला गळा
बहरला मळा भक्तीचा हा ४
सारा परिवार तुझिया छायेत
नेमाने तो येत नकळत ५
तिमिर घालव प्रकाश आणव
आम्हा गोडी लाव अध्यात्माची ६
ताई भाऊ आम्ही तुझिया पायाशी
सिद्ध श्रवणासी करी बोध ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९९३

।।जय माताजी।।

आई रेणुके गे शरण मी तुला
कवितेच्या फुला गंध हवा १
वासना नसावी भावना असावी
साधना घडावी नित्यनेमे २
अंतरी निर्मळ दृष्टीने प्रेमळ
वाणीने रसाळ करी भक्ता ३
सौभाग्याचे लेणे हळद नि कुंकू
अशिवाला जिंकू शक्ति देई ४
सुहास्य वदन राजीव लोचन
अतीव मोहक रूप तुझे ५
तूच ज्ञानेश्वरी तुकोबांचा गाथा
नाथ भागवत त्यातही तू ६
पहात राहावे बोलणे सरावे
मनाने रिघावे स्वरूपात ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके माऊली तुझ्या उत्‍सवात
आनंद मनात मावेनासा १
शशिसूर्यप्रभा उजळवी नभा
चैतन्‍याचा गाभा परि तूच २
आई सुहासिनी तूच सुभाषिणी
राग नि रागिणी संगीतात ३
पक्ष्‍यांचे कूजन भृंगांचे गुंजन
वाऱ्याचे विंझण स्‍तोत्र तुझे ४
योगियांचे ध्‍यान मुनींचे चिंतन
भक्‍तांचे वंदन तुजलागी ५
कैसे गे भारिले वेड गे लाविले
तूच लिहविले येथवर ६
ललितापंचमी रंगाची पंचमी
आश्विनात आली जणु आज ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.१०.१९९३

।।जय माताजी।। 

रेणुका आई गे अशी तू दूर का
अंतर दुस्तर भेटीआड १
कधी तो पाऊस वाटेत ती ओल
पावले ती खोल रुतताती २
तुझे हे देऊळ वाटते बोलवी 
प्रेमाने खुणावी बाळांनो या ३
देहाचा चिखल पाण्याने जाईल
मनाच्या शुद्धीला तुझे नाम ४
रेणुके तुकाई माझे तू विठाई 
कृष्णाई ज्ञानाई अंतरी ये ५
हाच धावा माझा हात दे सावर 
माया तू आवर माय माझे ६
अहंता जाऊ दे दृष्टीला दिसू दे 
हिताचे होऊ दे विनवणी ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१०.१९९३

।।जय माताजी।।

तुला आठविता रेणुका माऊली
काया थरारली आनंदाने १
तुझ्या स्‍मरणाने सार्थक जन्‍माचे
फळ पूजनाचे भक्तिभाव २
जेथे तेथे आई जेव्‍हा तेव्‍हा आई
जैसी तैसी आई दिसशी तू ३
देह ही घागर घालुनी फुंकर
सोऽहं चा सुस्‍वर ऐकव गे ४
फुगडी खेळावी जिवाने शिवाशी
सर्वसुखराशी प्राप्‍त झाल्‍या ५
तुझे हे मंदिर सर्वांना माहेर
भक्‍तीचा आहेर माहेराचा ६
जो तो प्रेमे वागो ऐक्‍यभाव जागो
दुजे काय मागो तुझ्यापाशी? ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.१०.१९९३



जय जय योगेश्वरी माता..

योगेश्वरी माता। जय जय योगेश्वरी माता! ध्रु. 

नरनारी ही तुझी लेकरे
रानामधली मुक्त पाखरे
विश्वासाने जगी विहरती, ना भय ना चिंता!१

सकलदेवमयी अगे योगिनी
धाव पाव विश्वाचे जननी
तुझ्याविना ना दुःखग्रस्ता दुजा कुणी त्राता!२

महालक्ष्मी महाकाली तू
महासरस्वती पुरवी हेतू
मजला गमशी महन्मग्ङले मातांची माता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१०.२००६

Thursday, October 15, 2020

आम्ही ज्ञानार्थी, विद्यार्थी

 
आम्ही ज्ञानार्थी, विद्यार्थी
बालवयातच या शाळेतच 
घालू आयुष्याचा पाया!ध्रु. 

विकास अमुचा साधायाचा
मार्ग आमुचा परिश्रमाचा
विश्वासे विश्वास वाढतो
चंदनसम झिजु दे काया!१

निर्णय अमुचा आम्ही घेऊ
कर्तव्यास्तव सिद्धच राहू
सावधान हा मंत्र जपावा
वेळ न जवळी दवडाया!२

भावी जीवन विशाल मंदिर
कळस तयाचा गाठे अंबर
निढळाचा या घाम गाळुनी
प्रगतिपथावर पुढे धावु या!३

शाळेहुन ही मोठी शाळा
विशाल जग हे मोठी शाळा
अनुभवातुनी ज्ञान लाभते
हवी कसोटी उतराया!४

विघ्ने आली येऊ देत ती
जीवनवीरा कसली भीती?
अभ्यासाने घडते प्रगती
क्षण क्षण लावू या कार्या!५

योगाभ्यासे आवरते मन
व्यायामाने कणखर हो तन
हीच शिदोरी आयुष्याची
जीवनभर ती पुरवू या!६

प्रयत्न म्हणजे शिक्षण आहे
शिक्षणातुनी विकसन आहे
आळसास त्या जरा न थारा
इतिहासाला घडवू या!७

एक एक गुण जोडत जाणे
हवे हवेसे सकलां होणे
योगेश्वर श्रीकृष्ण सारथी
रथात आरुढ होऊ या!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०३.०९.१९८९

Sunday, October 11, 2020

गीतेचे सार..

अर्जुनाच्या विषादाने         जिज्ञासा जागली असे
धर्म्य काय असे युद्ध          पार्था भोवळ येतसे १

आत्मा न जन्मतो नाशे      कार्य कर्म न चूकते
स्थितप्रज्ञ सदा शांत          पाप त्याला न लागते २

कामक्रोध महावैरी            झुंजायाचे तयासवे
यज्ञार्थ कर्म ना बाधे          अर्जुना पूस आसवे ३

ज्ञानयज्ञ असे थोर             पापा निमिषि लोपवी
मुमुक्षू करुनी कर्मे            अंतरात्म्यास तोषवी ४

कर्मयोग असे सोपा          संग सोडी धनंजया
आत्मनिष्ठ समाधानी        साध वीरा मनोजया ५

आवरी मन अभ्यासे         आत्मोध्दार स्वये करी
वैराग्ये साधतो योग          सन्मार्गी नेट तू धरी ६

उत्पत्ति स्थिति संहार        जगाचा माधवामुळे
व्यापुनी सर्व हे विश्व         राहिला तो दशांगुळे ७

सर्वदा  स्मरता कृष्णा       अंतकाळी मिळे गती 
आत्मज्ञान जया लाभे       योगी मोहन पावती ८

अनन्यभक्त हो माझा        माझे यजन तू करी
योजुनी मन तू ऐसे           प्रेमे जिंक पहा तरी ९

बुद्धियोग स्वये देतो         भक्ति पार्था करी अशी
विभूती मुख्य जाणूनी      योग्यता मिळवी कशी १०

अनन्यभक्तिने होते          शक्य जे रूप पाहणे
जाणुनि महिमा त्याचा     प्रर्थिले शीघ्र अर्जुने ११

सगुणी निर्गुणी भक्ती       ते दोन्ही सारखे प्रिय
फलत्यागी स्थितप्रज्ञ        ज्ञानी ध्यानी अतिप्रिय १२

शरीर म्हणजे क्षेत्र           आत्मा क्षेत्रज्ञ बोलती 
सर्व देही वसे आत्मा        निर्विकार नि अकृती १३

त्रैगुण्य म्हणजे काय        कर्ता ना त्रिगुणांविना
गुणातीत खरा भक्त        कृष्ण सांगे स्वये खुणा १४

वाढला वृक्ष अश्वत्थ        खाली फांद्या वरी मुळे
वैराग्य शस्त्र छेदाया        मोहने अर्जुना दिले १५

दैवी संपद् मोक्षदात्री       आसुरी दे अधोगती
अश्रद्ध जे दिशाहीन        त्यांना कोठुन सद्गती १६

कार्याकार्य कळे भेद       आदरे शास्त्र पाहता 
ॐ तत् सत् अशा बोले    संकल्पा येत पूर्णता १७

निःशंक पार्थ हो आता     हासे त्याची प्रसन्नता 
कर्तव्यस्मृति ही होता      पार्थ कृष्णच तत्त्वतः १८ 

गीतेचे सार मी नित्य       पाजावे तृषिता जना
स्वरूपानंद ध्यानात        हृष्ट तुष्ट दिसे मना १९

कृष्ण कर्ता कृष्ण वक्ता   ग्रंथकर्ताहि कृष्ण तो 
अंतरीच्या प्रकाशात        राम कृष्णास वंदितो २०

जीवनात असे गीता        जैसी त्याला कळे तशी 
अमृताची तया गोडी       जो जो सेवी तया तशी २१

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१०.१९८२

Saturday, October 10, 2020

उठि उठि गोपाळा, कृष्णा विलंब बहु झाला !

उठि उठि गोपाळा, कृष्णा
विलंब बहु झाला !ध्रु.

धर्माला या कळा उतरती
कोण मीच हे सकल विसरती
डोळे असुनी लोक आंधळे, घाल अंजनाला !१

आत्मश्रद्धा तुझी लाभु दे
अन्यायाची चीड येउ दे
भित्रेपण लज्जास्पद असते घुमव प्रणवाला !२

तू गोपाळा कसे जमविले
झुंजायाला समर्थ बनले
अपुल्या हाते आम्ही घडवू दिव्य भविष्याला !३

कंसाची ना तमा कुणाला
कठोर शासन पापात्म्याला
अर्थ अहिंसेचा उमगावा ज्या त्या छाव्याला !४

शरीर नश्वर मी तर नाही
मन बुद्धी वा काही नाही
सोऽहं प्रत्यय गीता देते खचित साधकाला !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०६.२००६

Wednesday, October 7, 2020

उषादेवते ..

 
उषादेवते, तुजला वंदन!
जीवनात ये, तुला निमंत्रण !ध्रु. 

रवि उदयाचलि येऊ पाहे
मंद समीरण वाहत आहे
मनी जागतो श्री यदुनंदन !१

तुज भूपाळी गाता गाता
देहभान हे जाता जाता
गीता करते घरी पदार्पण !२

सर्वभाव ओतून आळवित
मिटल्या नयनी तेज साठवित
साधक करती प्रकाशपूजन !३

सत्संगे जागते चेतना
सत्कार्या लाभते प्रेरणा
चिंतनातुनी मिळे चिरंतन !४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.१०.१९८५

भूपाळी श्री गुरुदत्तांची

श्रीगुरुदत्ता मला प्रभाती आपण जागविले 
दत्त दत्त जप आतुन चाले आपण ऐकविले!

औदुंबर वृक्षाच्या खाली जाउन बैसावे
मिटता डोळे दत्त दिगंबर पुढती ठाकावे 
माझ्या माथी हात आपला हे मज जाणवले! 

भस्म लाविले माझ्या भाळी कृपा आगळी ही 
नित्य नवा दिन मला दिवाळी कृपा वेगळी ही 
परमार्थाचे सौख्य लुटावे कसे मला कळले! 

सत्य शिवाच्या सुंदरतेच्या मार्गावर चाल 
त्रिगुणातीतच  तुला व्हायचे उजळ भावि काल 
वैराग्यासम कुणी न साथी मजला बोधविले!
 
प्रासादाहुन पर्णकुटी ही किती तरी छान 
दूर जनांहुन वनात कर रे ध्यानामृतपान
तुझ्यात मी अन् मदंतरी तू वच कानी आले!

दानासाठी हात आपला चिंतनास हे मन
नामासाठी रसना आहे कर्मा कर दोन
सावध संचारास लाभली दोन्ही ही पाउले!

साधेपण जे तनामनाचे त्यातच आनंद
नको अमीरी बरी फकीरी तो परमानंद
जगदाधारा उपदेशाने पावन मन केले!

गुरुचरिताची गोडी ऐसी साधकास गीता
जीवनयात्रा सोपी होते सरताती चिंता
वत्सा मी पाठीशी आहे अभयदान दिधले!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.११.१९८९

Tuesday, October 6, 2020

ग्रंथ भागवत

ग्रंथ भागवत       थोर भक्तिकथा
ऐकताच भक्ता    मोक्षलाभ !१

याच देही मुक्ती    सांगे हरि युक्ती
यात्रिकाला शक्ती  चालावया !२

कृष्णनाम गावे      देहातीत व्हावे
अंतरी पहावे         ज्याचे त्याने !३

इंद्रियांच्या गाई      सांभाळी गोपाळ
भक्तांचा सांभाळ   तोच करी !४

आत्म्याची मुरली   ऐकतो संयमी
तो न रमे कामी      सदा स्वस्थ !५

वासुदेव हरि          पांडुरंग हरि
राम कृष्ण हरि       म्हणा म्हणा !६

नाम मुखी यावे      ऐसे जर व्हावे
नाम नेटे घ्यावे       गोविंदाचे !७

म्हणा कृष्ण कृष्ण  कळू लागे गीता
अर्थ सांगे भक्ता     जीवनाचा !८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०७.१९९०

Monday, October 5, 2020

सांब सदाशिव तुजला वंदन

सांब सदाशिव तुजला वंदन
स्मशानवासी पापहरा
सोऽहं सोऽहं डमरू वाजे, अज्ञानाचा कर निचरा ! ध्रु. 

वामांगी पार्वती बैसली
तत्त्वचिंतनी पुरती रमली
आदिनाथ हे, आदिगुरुच तू योगिराज हे महेश्वरा !१

शिव शिव म्हणता शांत वाटते 
निवांत निश्चल काया होते
अभ्यासा साधका बसविशी, शिक्षक प्रेमळ कुशल खरा !२

जटेतुनी तर गंगा उसळे
त्रिविधताप हे विलया गेले
क्रोधनाग तुज वश झालेला, रुळतो कंठी उमाहरा !३

कुठली थंडी ऊनहि कसले
मुसळधार जरि मेघ बरसले
हिमाचलासम तूही अविचल,  वंदनीय म्हणुनी रुद्रा !४

भस्म तुझे लावताच भाळी
काम न शिवतो कधी अवेळी
चंद्रकोर जी विलसे भाळी, प्रसन्न करिते वसुंधरा !५

संहारातुन नवी निर्मिती
इकडे मृत्यू तिथे निर्मिती
चिरंतना हे, निरंजना हे, प्रणाम घे रे उमाहरा !६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०८.१९८९

Sunday, October 4, 2020

आई रेणुकेचा जयघोष

आई रेणुके तुझाच जय जय
तिमिर घालवी कर ज्ञानोदय १

आई रेणुके तुझाच जय जय
तू उत्पत्ती स्थिती आणि लय २

आई रेणुके, तुझाच जय जय
मना उलटवी कर गे निर्भय ३

आई रेणुके, तुझाच जय जय
सूर ताल तू नर्तनात लय ४

आई रेणुके, तुझाच जय जय
तू दुर्गा तू पुण्याचा जय ५

आई रेणुके, तुझाच जय जय
नवीन दृष्टी पापाचा क्षय ६

आई रेणुके, तुझाच जय जय
कला शास्त्र तू विद्या अक्षय ७

आई रेणुके, तुझाच जय जय
तूच विरक्ती शक्तीसंचय ८

आई रेणुके, तुझाच जय जय
उमा, रमा, सावित्री जय जय ९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०९.१९९५

कृष्ण, गोविंद गोविंद, कृष्ण गोपाल गोपाल


"कृष्ण, गोविंद गोविंद" गाई मना!
"कृष्ण, गोपाल गोपाल" ध्याई मना !ध्रु. 

श्वास साथी तुझा सख्य त्याशी करी
श्याम कैसी तनी वाजवी बासरी
आणवी तू मनी लाडक्या मोहना!१

काय दुःखात तू? पूस रे आसवे
हास थोडा तरी कृष्ण बोले सवे
वेद झाल्या पहा पूर्विच्या वेदना !२

गाई राखे कसा, देह राखी तसा
धार काढे कसा, बोध घेई तसा
संयमी तो सुखी आवडे सज्जना !३

काम हा कालिया क्रोध हा कालिया
मत्सरू कालिया दंभ ही कालिया
ठेच त्याची फणा देवकीनंदना !४

कंस मामा जरी क्रूरकर्माच तो
आप्त झाला जरी वध्य आहेच तो
तूच निर्धार दे चेतवी चेतना !५

कर्म जे कोठले 'यज्ञ' म्हणुनी करी
श्रेय त्या अर्पिता तोषतो श्रीहरी
यज्ञचक्रास तो देतसे चालना !६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
९.८.१९८९ 

ध्यान कर आदेश मिळेल


आसनी तू बैस स्वस्थ
तने मने होत शांत।
सद्गुरु जे अंतरात 
बोलतील ।१

बोलतील अरे पुत्रा
खिन्न काय तुझी मुद्रा
जाण तूच तुला मित्रा
अजन्मा तू ।२

अजन्मा तू तत्त्व ते तू
साधनेचा दिव्य हेतू
दक्ष राही सदाचा तू
आनंदी हो ।३

आनंदी हो करी कर्म
प्राप्त कर्म हाच धर्म।
फलत्याग हेच मर्म 
ध्यानी घ्यावे ।४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.१०.१९८६

Thursday, October 1, 2020

स्वामी माधवनाथांचा प्रसाद मज लाभला

स्वामी माधवनाथांचा   प्रसाद मज लाभला
किरणांच्या प्रकाशात   वाटचाल करी मुला

साधनेची वाट सोपी      गोडी वाढो तिची मनी
सोsहं ध्यानी रमावे तू    कोठेही जा जनी वनी

आशीर्वाद प्रभावी हा     पाठ राखी सदा कदा
देहबुद्धी घालवी तो       लाभ याहून कोणता

आता नाही कुठे जाणे    आसनी स्वस्थ बैसणे
पाहताना स्वरूपाला      शांत होणे तने मने

कुणी वंदो कुणी निंदो    कुरवाळो पिटो कुणी
उपाधींची नसे चिंता      आकाशासम होत मी

सुधास्रोत असे आत      अभ्यासी पूर्ण जाणवे
त्याचा लाभ तना होत    कर्तव्यी ना पडे उणे

ईश्र्वरार्पण वृत्तीही         साधका उपकारक 
अद्वैत बोध आतूनी        श्रीरामा उपकारक

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०१.१९८६

गीता


तुज जगावयाचे आहे
तुज लढावयाचे आहे
तुज हसावयाचे आहे
शिकवते हरीची गीता १

तू झटक मोह देहाचा
कर होमच आयुष्याचा
आदर्श होई धर्माचा
दे स्फूर्ति निरंतर गीता २

सुखदुःखा सम समजावे
कर्तव्या सादर व्हावे
ना फलाशेत गुंतावे
निरपेक्ष करतसे गीता ३

तव जन्माआधी होती
तव पोषण करणारी ती
तू गेल्यावर असते ती
धीराची दात्री गीता ४

सहकार्य करावे लागे
शरणागत व्हावे लागे
तळमळ ना आपण भागे
सोसण्या शिकवते गीता ५

अप्रिय जरी सत्यच बोल
आघातही बुद्ध्या झेल
नच जाऊ देणे तोल
कसरत घे करवुन गीता ६

घे योगेश्वर वदवून
घे पार्थसखा लिहवून
दाखवी स्वये जगवून
श्रीकृष्णचरित श्रीगीता ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०५.२००४

Thursday, September 24, 2020

तू आजारी पडशी म्हणजे



तू आजारी पडशी म्हणजे देवाचा अपराधी तू
देह तुझा तो ठेव तयाची मोल न कैसे जाणत तू? ध्रु.

श्री नारायण जय नारायण नरतनु आहे सुंदर साधन
नाम स्मरता, पतितहि पावन सदाचार हा अंगी मुरवुन
हो नारायण संत सांगती रहस्य घे ना जाणून तू !१

जिथून आलो तिथे जायचे मी माझे हे विसरायाचे
चिंतन औषध चिंतांवरचे शिकव मना सगळे रामाचे
विषयी विरक्ती भजनी प्रीती सत्संगी जा रमून तू !२

झाले गेले विसरून जावे, क्षमा धरेचे नाम स्वभावे
घराघरांना जोडत जावे दीनदुःखिता जवळ करावे
आसू पुसता फुलते हासू नयनरम्य हो श्रावण तू! ३

आहारावर आचारावर ठेव नियंत्रण पुरता सावर
मुक्त मनाने विश्वी वावर नाम होउ दे तुला अनावर
जगावयाची भगवद्गीता भगवंताला ओळख तू !४

साहित्याच्या अभ्यासाने मना विस्तरी समरसतेने
पुढे पुढे चल निर्धाराने गाठशील रामाचे ठाणे
प्रकाश ज्ञानाचा मोदाचा देणारा हो दीपक तू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.११.२००१

Sunday, September 20, 2020

भूपाळी भारताची..

प्रभात झाली मनी माझिया जाग जाग भारता
भूपाळी तुज गाता गाता प्रसन्नता चित्ता !ध्रु. 

नैराश्याचे तिमिर लोपले ध्येयसूर्य उगवतो
कोण मी? करू काय? प्राश्निका सद्गुरु सापडतो 
मी देशाचा, भारत माझा लवतो मम माथा!१

स्वराज्य आले बलिदानाने कळत कसे नाही
धनसत्तेचा लोभ अनावर कृतघ्न करू पाही
स्वातंत्र्याचा अर्थ गहनतर ये कोणा सांगता? २

स्वभाव येतो सुधारता हे गीता सांगे मला
वैराग्याने अभ्यासाने पथ मज उलगडला
भारतीय मी हृदयोहृदयी जागविण्या अस्मिता !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.०९.१९८३

Thursday, September 10, 2020

सहकाराने चालू या!

सहकारेण समृद्धि:
समृद्ध्या विघ्ननाशनम्।
विघ्ननाशेन स्थैर्यं च
स्थैर्यं विश्वासकारणम् ।।

अर्थ : परस्पर सहकार्याने देशाची समृद्धी होते. त्या समृद्धीने विघ्नांचा नाश होतो. विघ्ने नाहीशी झाल्याने राष्ट्राला स्थैर्य प्राप्त होते आणि आर्थिक स्थैर्य विश्वासाचे कारण आहे. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

जुलै १९८८

Tuesday, September 8, 2020

श्रीज्ञानेश्वरी हाती आली 'वाचत जा मज' असे म्हणाली

श्रीज्ञानेश्वरी हाती आली
'वाचत जा मज' असे म्हणाली !ध्रु.

अक्षर अक्षर सजीव झाले
भाग्य आज मम उदया आले
असे वाटते आज दिवाळी !१

जवळ घेतसे गोड वदतसे
कर्तव्याची जाण देतसे
हितकारिणी ही मायमाउली !२

अवचित नाते जुळून आले
भक्तिरोपटे सुंदर रुजले
शुभ्र फुलांनी ओंजळ भरली !३

मने मनाला जोडुन घ्यावी
विश्वात्मकता सवय बनावी
ओवीने मज भक्ति शिकवली !४

मागायाचे काही न उरले
कृतज्ञतेने मन गहिवरले
सर अश्रूंची झरली गाली !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.७.२००१

वाचु या ज्ञानेश्वरी..



जीवनी या धन्य होऊ
वाचु या ज्ञानेश्वरी! ध्रु. 

माउली ही बोलवीते
हाक कानी का न येते?
कृष्णगीता बासरी !१

सोसुनी आघात सारे
वज्रदेही व्हायचे रे
ठेव मुद्रा हासरी !२

सज्जनांचा मेळ व्हावा
सत्कृतीचा ध्यास घ्यावा
सांगतो हे श्रीहरी !३

द्वैत सारे लोपण्याला
एकता ही बाणण्याला
कार्य घेऊ हे करी !४

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
दु:खिता हृदयी धरावे
राम आशा ही धरी !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.५.१९८४

ओवी ज्ञानेशाची गावी

ओवी ज्ञानेशाची गावी गाता गाता ध्यात जावी 
तनी मनी मुरवावी ज्ञानेश्वरी !१

ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन सुगम करिता नित्य मनन 
स्वये मोहन दे दर्शन भाविकाला !२ 

भाविकाला विश्व घर कुरुक्षेत्र हे माहेर 
कर्तव्यात मोद फार अभ्यासाने !३

अभ्यासाने सर्व सोपे प्रबोधशक्ती जागी होते 
अंतरंगी आपण येते मृदुपण !४

मृदुपण आईचेच हवे सर्वां सदाचेच 
संतरूप मातेचेच कळो येई !५

कळो येई पसायदाने आता आम्हा काय उणे 
झाले जीवनाचे सोने पूर्वपुण्ये !६

पूर्वपुण्ये हा सत्संग आगळाच भक्तिरंग 
होता सोsहं ध्यानी दंग उजाडेल !७

उजाडेल ऐसी आशा मौनावेल मग भाषा 
उजळेल भाग्यरेषा श्रीरामाची !८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.५.१९८४

प्रसन्न ओव्यांमधुनि होतसे गीतार्थाचा पट साकार!

प्रसन्न ओव्यांमधुनि होतसे गीतार्थाचा पट साकार! ध्रु. 

गुरुप्रसादे काव्य बहरले 
श्रोत्यांचे मनमोर नाचले
सुबोध भाष्या अनुभविताना आनंदा ना पारावार !१

ओवीमागुनि ओवी स्फुरते
गंगाजलि मन चिंब नाहते
इंद्रधनूचे रंग जणू की काव्यलेखनी हा भरणार !२

श्रीज्ञानाचे मोहक आर्जव
शब्दयोजनी अपूर्व पाट
पसायदानी श्रीहरि तोषे शांतीचे सुख अपरंपार !३

श्रीगुरु म्हणता सहज तथास्तु
गीतार्थाची प्रपूर्ण वास्तु
हरिभजनाची देत प्रेरणा अध्यात्माची अमृतधार!४

'लेणे देशीकार' घडविले
प्रवरेने मस्तकी घेतले
नगरोनगरी सुकाळु झाला अमृतवेली या फुलणार!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.६.१९७३

ज्ञानेश्वरी वर ईश्वरी !

ज्ञानेश्वरी वर ईश्वरी ! 
ज्ञानेश्वरी वर ईश्वरी !ध्रु. 

नितवाचने नितगायने 
नितचिंतने नितदर्शने 
कानी घुमे मधुबासरी! १

तृप्तास ही छाया गमे 
उद्यानि या यात्री रमे
संजीवनी ही भूवरी!२

करुणाक्षरे ही वाचणे 
घननीळ तो मनि पाहणे 
गुरुबोध हा ठसला उरी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 6, 2020

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम - २

रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम !ध्रु 

नाम मधुर श्रीरामाचे, जपता सार्थक जन्माचे
चिंतांना दे पूर्णविराम!१

जन्म मरण पाउले खरी, अनंतराघवपथावरी 
प्रवासात या घ्यावे नाम !२ 

कोण असे मी चिंतावे तो मी तो मी घोकावे 
आतून शिकवी आत्माराम!३

श्रीरामायण वाचावे, ऐकावे भावे गावे 
जीवनविद्या शिकवी राम!४

जीवनातला श्रीराम, संगत दे घेता नाम 
आळव आळव प्रेमे नाम!५

श्रीरामाने पाठवले, पाहिजेच त्या आठवले 
मना माझिया घेई नाम !६

क्षणहि न वाया दवडावा, रघुपति राघव तो ध्यावा 
उगमापाशी नेतो राम !७

नाम स्मरता दिनरात राम आतला दे हात 
निश्चय ऐसा बाळग ठाम !८ 

यत्नांची तू शर्थ करी, राघव ठेवी हात शिरी 
उपासनाबळ पुरवी राम !९ 

रडू नको रे झुरु नको आत्मानंदा मुकु नको 
आनंदाचे स्वरूप नाम !१०

सुधारेन मी भाव हवा, सत्कृत्याचा  ध्यास हवा
प्रगतिपथावर नेतो राम !११

देवांना जो मुक्त करी त्या रामाचे स्मरण करी 
बंधविमोचक एकच राम !१२

अनुभव नामाचा घ्यावा, अनुभव रामाचा घ्यावा
चैतन्याचा प्रवाह राम !१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.२.१९९०

Saturday, September 5, 2020

श्रीगणेशा करू

 संस्कारांचा सत्कार्याचा 
"श्रीगणेशा" करू !ध्रु. 

नमू गणेशा, नमू शारदा 
नमू जन्मदा, नमू ज्ञानदा 
वंदनभक्ति करू !१ 

प्रभातसमयी करू पाठांतर 
चिंतन करता प्रश्ना उत्तर 
प्रज्ञा कल्पतरू !२ 

कष्टाविण फळ कधीच नाही
अशक्य शब्दच कोशी नाही 
नवे भगीरथ ठरू !३

एक हृदय हो भारतजननी
प्राण पणा लावू उद्धरणी 
दुस्तर सागर तरू !४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.९.१९८३

नित्य नवा दिन सुधारण्याचा..

नित्य नवा दिन सुधारण्याचा !ध्रु. 

जो चुकतो तो मानव आहे 
क्षमाशील तो देवच आहे
शिल्पकार मी आयुष्याचा !१

चुकांस जगती काय भ्यायचे
निजकर्तव्या करत राह्यचे 
ईश्वर साथी चलणाऱ्याचा !२

बीज दडतसे धरणीपोटी 
पर्णगीत मग तरुच्या ओठी 
विक्रम सारा अनामिकाचा !३

सद्भावाची भूक जगाला 
प्रसन्न माधव सद्भक्ताला 
पाठ गिरवणे सत्कर्माचा !४ 
 
विषयाकडची धाव थांबवुन
मनास घ्यावे आपण वळवुन
राम अंतरी पहावयाचा !३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.९.१९८३

माझे जीवन: माझी बाळे परब्रह्म तर मज सापडले

 माझे जीवन: माझी बाळे
परब्रह्म तर मज सापडले!ध्रु.

अवती भवती मुले नाचती
अंगणात जणु फुले डोलती
एक अनामिक गंध दरवळे!१

सूर गवसला गाउन घ्यावे
कृष्णरूप नयनांनी प्यावे
शाळा मजला गोकुळ गमले!२

मी वनमाळी बालोज्ञानी
भगवंताचा ऋणी म्हणूनी
कृतज्ञतेने कर हे जुळले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.१०.१९८३
(माझे जीवन माझी बाळं या शि द रेगे लिखित पुस्तकावर आधारित काव्य) 

ज्ञानदान हे व्रत माझे

 "ज्ञानदान" हे व्रत माझे, 
माझे दैवत, मुले!ध्रु. 

रोज भेटतो मी बाळांना
विहितकर्म हे आचरिताना
गीता थोडी कळे!१

शाळा गमते सदनच माझे
शिक्षक माझे, सेवक माझे
नवीन नाते जुळे!२

संस्कारांनी बनलो शिक्षक
ज्ञानपथाचा मी तर यात्रिक
प्रभुने चालवले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.९.१९८३

Thursday, September 3, 2020

पंतमहाराज बाळेकुंद्री

पंत हा प्रेमाचा अवतार
पंत हा दत्ताचा अवतार!ध्रु. 

मवाळ भाषा, लोचन प्रेमळ
शब्दही ओले, प्राणही व्याकुळ
नेत हा भाविकास भव पार!१

एकतारी घे, चिपळ्याही धर
वाजव दिमडी, आळव सुस्वर
पंत तुज भजनी रंगविणार!२

निद्रेतुन हा तुला जागवी
मातेची ममताच बोलवी
पंत मग हृदयाशी धरणार!३

पंत विसावा तनामनाला
पंत दिलासा चुकणाऱ्याला
पंत हा भक्तिपथे नेणार!४

पंचप्राण जर व्याकुळ झाले
दिनरातींचे भान न उरले
पंत हा घरबसल्या दिसणार!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.३.१९८३

Monday, August 31, 2020

महाराष्ट्राची मंगलता..

महाराष्ट्राची मंगलता ती 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती!ध्रु.

पुण्यात यावे, दर्शन घ्यावे 
ध्यान देखणे बघत राहावे
आनंदाश्रू ओसंडताती !१

अलंकार सजवती मूर्तिला
की मूर्ति सजविते अलंकृतीला
प्रश्न पडे भक्तांच्या पुढती ! २ 

सात्विक सुंदर गणेश प्रेमळ 
करतो अपुले तनमन निर्मळ 
रम्य स्मृति या वेधुन घेती !३

गणपति पुढती उभा ठाकला
निवांत निर्भय क्षणात झाला
नकळत अगणित कर जुळताती !४

शब्दाविण त्या कळले सारे 
तुझ्या आत मी वसे पहा रे
मिश्किल हासत वदे गणपती !५

सांगायाचे नुरले काही 
मागायाचे काही नाही 
सरल्या खंती, सरली भ्रांती !६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.९.२००४

Sunday, August 30, 2020

एका जनार्दनी

एका जनार्दनी रंगे निरुपणी 
पाहे नित्य जनी जनार्दन १

संसारी असूनी विरागी नि ज्ञानी 
एक तत्त्व मनी सोपे नाम २

ग्रंथ भागवत जाणुनी भावार्थ 
शिरे आत आत शांतिब्रह्म ३ 

गिरिजा ही भार्या आत्मयास काया
जनी वावराया जोडपे ते  ४ 

हरि त्यांचा सुत वैदिक पंडित
कांचन हो तप्त अग्नीमुळे ५

दया क्षमा शांती एकाची विश्रांती
जाणे जनरीती एकनाथ ६ 

करी सोपे ज्ञान करी गोड गान
सोsहचे ते भान नित्य त्यास ७

चंदनाचा गंध ऐसा भावबंध
श्रीरामा आनंद अभ्यासात ८ 

दुःखातले सुख वियोगात योग
सत्य होती भोग हीच कृपा ९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३.२.१९९७

पुंडलीकवरदा हरि विठ्ठल!

पुंडलीकवरदा हरि विठ्ठल!ध्रु.
 
पुंडलिकाने गारुड केले 
मायतात चरणांना चुरले
जगजेठी तर धावुन आले 
जणू पकडला निसटताच पळ!१

सेवेविण ज्या दुसरे काही 
रुचतच नाही सुचतहि नाही
नच गणता ये ती पुण्याई 
विटेवरी हरि ठाके निश्चल!२

वर देणारा सिद्ध सर्वदा
नच मागे वर भक्त परि कदा
समाधान बहुमोल संपदा 
ध्यान विटेवर सुंदर प्रेमळ!३

न कळताच अस्तित्व लोपले
परतायाचे नाही उरले 
दिक्कालांना लंघुन गेले 
पुंडलीक झालेला विठ्ठल!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.६.२००४

पूजा

मूर्ति पाहिली तुझी देहभान लोपले!
मावळले जगच सर्व शांत शांत वाटले!ध्रु.

तू विष्णू, तू शंकर, तू गणेश अच्युता 
मनही तूच, पवन तूच, गगन तूच अच्युता
मिटले हे नयन तरी दीप हे प्रकाशले १

हात जोडता तुला अश्रुपूर लोटला
स्तोत्रगान करु जाता कंठ पूर्ण दाटला
चित्तचोर तू असा मला न भिन्न ठेवले २

चालता इथे तिथे तीर्थ गमन होय ना 
पाहता इथे तिथे विषय तूच लोचना 
कर्म जे करातले तू हि पुष्प मानले ३
 
कधी कुठे  कुणा कसा भासलास मोहना
जया जसा तया तसा तूच तूच होय ना
तमास भेदतात हे ज्ञानकिरण कोवळे!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(मूर्तिपूजा हा परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचा छोटेखानी ग्रंथ वाचताना)
२.९.१९८९

Saturday, August 29, 2020

दिसला ॐकारात गणेश!


दिसला ॐकारात गणेश!
भरला नयनी सुरम्य वेष !ध्रु.

लंबोदर पीतांबर दिसला
पाठीवरुनी हातहि फिरला 
धीर मज देताहे परमेश !१ 

शुंडा हाले, किरीट झळके
सुवर्णकांती कैसी फाके 
गगनी ये उदयास दिनेश !२

अथर्वशीर्षे शांतवीत मन
समूहगाने पुलकित हो तन
आत्मबल पुरवित मला गणेश !३

नको करू तू कसली चिंता
चिंतामणि ये तुझिया हाता
तुजवर प्रसन्न सांब नटेश ! ४

रविरायाला अर्घ्य देत चल
आनंदाची कर उधळण चल
मिळाला श्रीरामा आदेश!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.८.१९८४

मंगलमूर्ती मोरया

मंगलमूर्ती मोरया!ध्रु.

घवघवीत बघुनी मूर्ती 
कर अमुचे नकळत जुळती 
अभयदान द्यावे सदया! १

आनंद असतो हातात 
मोदक आणत ध्यानात 
भेदभाव जाई विलया! २ 

अंकुश ठेवा मनावर 
पाश फेकणे रिपूवर 
द्या शक्ती अरि मर्दाया! ३ 

आसन सुस्थिर झालेले 
निष्प्रभ ठरताती हल्ले 
आत्मश्रद्धा द्या हो द्या! ४ 

मस्तक ठेवी शांत सदा 
स्थितप्रज्ञ विजयीच सदा
शिकवा विद्या आचार्या! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.२००३

Monday, August 24, 2020

श्री केळकर प्रशस्ति

नृसिंहनामा सौम्यस्तथापि 
य: पत्रकारो वक्ता सुशील:
सुवर्णमध्येन लोकप्रिय: स: 
नमाम्यहं केलकरं प्रसन्नम् 

अर्थ : 

जरी नाव 'नरसिंह' तरी स्वभावाने सौम्यच, विख्यात पत्रकार आणि चारित्र्यसंपन्न वक्ते - आपल्या सुवर्णमध्य शोधण्याच्या कौशल्याने लोकप्रिय झालेले प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे श्री केळकर यांना मी नमस्कार करतो. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

  


श्री गजाननमहाराज भक्तिस्तोत्र - ३


शेगावीच्या गजानना तुज भल्या पहाटे वंदावे 
शब्दामागुन शब्द सुचावे भावपुष्प  हे उमलावे ।।१।।

आजानुबाहू दिगंबरा हे सुवर्णकांती लखलखते
'गण गण गणात बोते' गाता विश्वाशी जुळले नाते ।।२।।

अन्न ब्रह्म हे ध्यानी येण्या शिते शिते सेवन केली 
गढूळ कसले ही तर गंगा जलात गंगा पाहियली ।।३।।

गजानना तू शंकर भोळा सद्भावाची भूक तुला 
चून भाकरी अगदी प्यारी भक्तीचा नैवेद्य तुला ।।४।।

द्वाड इंद्रिये खट्याळ घोडे नामाचा लावुनि दोर 
सुशांत केले निवांत केले खोड्यांचा सरला जोर ।।५।।

नुसती काडी धरली तरिही चिलीम घेते, पेट कशी? 
चमत्कार छे यौगिक लीला सहज दाविली सुंदरशी ।।६।। 

गाय जगाची असते आई जखडायाचे तिला कसे 
मीच वासरू असे भावुनी नाते जुळवा सुंदरसे ।।७।। 

मी मधमाशी, कणसे ती मी, डंखाचे भय काय मला? 
सुखदुःखांचा लेप न कसला पूजक पूज्यहि मीच मला ।।८।।

नरनारी हा भेद वरिवरी सगळी रूपे देवाची 
वासनेस ना अवसर येथे देवघेव हो प्रेमाची।।९।।

दुही राक्षसी निर्दालावी एकपणा तो जाणावा 
द्वेष नि मत्सर घात साधती जो तो भाविक दक्ष हवा ।।१०।।
 
भोग भोगुनी सारायाचा टिळकांना भाकर दिधली 
रहस्य गीतेचे उलगडले हाती आली गुरुकिल्ली ।।११।। 

ऊस घेऊनी झोडपले परि योगी विचलीत ना झाला 
मारत्यास रस यथेच्छ दिधला जागविला मनि जिव्हाळा ।।१२।।

महारोग तो खरा मनाचा गुलाम जो तो देहाचा 
नव्हे देह मी या बोधाने मानव सागर ज्ञानाचा ।।१३।।

पलंग पेटे भान न याचे गीता आली आचरणी 
दिव्यत्वाची दिली प्रचीती उभ्या जगाला सद्गुरुनी।।१४।।

'तो मी विठ्ठल' असे दाविले भावामध्ये देव असे 
मनमोकळा उदार हसरा विश्व सदन त्याला भासे ।।१५।।

काम आपुले चोख करावे परिणामाची का चिंता ? 
मधुर बोलणे गोड वागणे संतांची जीवनगाथा ।।१६।।

पोथी घ्यावी दासगणूंची ओवी ओवी वाचावी 
मनन करावे समर्थ वदती आतुन वृत्ती बदलावी।।१७।।

सज्जनगडचे रामदास ते शेगावीचे गजानन 
शेगावीच्या गजाननावर लुब्ध जाहले गुणी जन ।।१८।।

माणुसकी हा धर्म खरोखर सदाचार ही खूण असे 
उभ्या जगाला दूध देत ती गाय वंद्य माताच दिसे।।१९।। 

मन कोणाचे नच दुखवावे गजाननाची पूजा ही 
दीनदुःखिता हृदयी धरावे गजाननाची गीता ही ।।२०।।

श्रीरामाला प्रसाद अवचित त्या लाभाने गहिवरला 
श्रीगजानन जय गजानन परिसर गंधित झालेला ।।२१।।

।।शुभं भवतु।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, August 23, 2020

श्रीगजानन महाराज भक्तिस्तोत्र - २


गजानन माझा । योगी शेगावीचा
लीला त्याच्या गाव्या। नित्यनेमे ।।१।। 

गावा गजानन । ध्यावा गजानन
पोथीचे वाचन । सोडू नये ।।२।।

संत दासगणू । गुण किती वानू?
साकारली त्यांनी। ब्रम्हमूर्ती ।।३।।

करा मन मोठे। दुःखा वाव कोठे?
चैतन्य प्रकटे । अंतरंगी ।।४।। 

दृष्टी जी निर्मळ । अत्यंत प्रेमळ
अफाट क्रोधाला। शांतवीते ।।५।।

सहन करावे । दुःख जे देहाचे
नाभीच्या पासून । नाम घ्यावे ।।६।। 

स्फुरतो ओंकार । ज्याच्या त्याच्या आत 
रूप गणेशाचे । सांगे तुका ।।७।।

कुष्ठरोग्याचीही । घडो काही सेवा
नयेच दुरावा। मनी आणू ।।८।।

माझा गजानन । उघडा वाघडा
स्वच्छ स्पष्ट तैसा । व्यवहार ।।९।।

वासनेची वस्त्रे। जरी जरतारी
साधूच्या अंगाला । बोचतात ।।१०।।
 
चून नि भाकरी । त्याला प्यारी भारी 
भोजन साधेच । असो द्यावे ।।११।।
 
शेगावला जावे । गावात फिरावे
नेत्री साठवावे।  रूप त्याचे ।।१२।।

अरे माणसा तू । माणुसकी धर्म
नित्य हृदयात । ठेव जागा ।।१३।।

भांडावे कशाला ? तंडावे कशाला
गर्व तो फुकाचा । दुःखमूळ ।।१४।।

घराचा तुरुंग । फोडून बाहेर
मोकळी ती हवा । घेई जरा ।।१५।। 

सोड माझे माझे । फेक दूर ओझे
सुशांत नि स्वस्थ । होशील तू ।।१६।। 

ओवी ओवी वाच । मुरव मनात
अध्यात्म ते आहे । जगायचे ।।१७।। 

जे जे ठावे तुला । सांगावे जनांना
परोपरीने तू । शिकवावे ।।१८।।

काम झाल्यावर । कशाला थांबावे ?
फळ ना इच्छावे । कर्माचे त्या ।।१९।।

होशील मोकळा । वाचल्याने पोथी
गणू सांगे गोष्टी । कल्याणाच्या ।।२०।।

ओव्या एकवीस । बोधाच्या या दूर्वा
अर्पूनीया देवा । धन्य राम ।।२१।।

।।श्री गजानन महाराज की जय।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

श्रीगजानन महाराज भक्तिस्तोत्र - १


शेगावीच्या गजानना । शांत करी माझ्या मना 
येऊ दे माझी करुणा । तुला तरी ।।१।। 

लावी मला नित्यनेम । आचारात भरो प्रेम 
सर्वांचेच असो क्षेम । भाव देई ।।२।। 

निराशेने ग्रासे मन । कण कण झिजे तन 
जीव जाई वेडावून । का न कळे ।।३।। 

अश्रू नाही तरी दुःख । हृदयास पोळे शोक 
काय तुझे हे कौतुक । उमजे ना ।।४।।

तुझी दया तुझे ज्ञान । तुझी दृष्टी तुझे गान 
तुझे स्मरण सन्मान । अध्यात्माचा ।।५।। 

निरोगी तू करी मन । निरोगी तू करी तन 
सोsहं सोsहं हे स्फुरण । जाणवू दे ।।६।।

तुझी पोथी मला गीता । तुझी पोथी मला माता 
तुझा हस्त शिरी आता।  राहो देई ।।७।। 

साठवीता कुजे द्रव्य । दान देता वाढे द्रव्य 
वाहते ते खरे द्रव्य । खरी गंगा ।।८।। 

आसक्ती हा महारोग । वैराग्यच तुझा योग 
भोगूनीच सरे भोग । ज्याचा त्याचा ।।९।। 

भूक नाही निद्रा नाही   तृषा नाही शांती नाही 
विवेकाची जोड नाही । आयुष्यात ।।१०।। 

वासना ही दुःखमूळ । वासना हा पोटशूळ 
घालवी हे सारे खूळ । मनातून ।।११।। 

स्वये सोसलास त्रास । मारत्यास दिला रस 
क्षमा कन्या ही औरस । मायबापा ।।१२।। 

अलिप्तता शिकावी ही । तटस्थता शिकावी ही 
योगमाया शिकावी ही । ऐशी उर्मी ।।१३।। 

सर्वांभूती देव ज्ञान । सर्वांभूती दया ज्ञान 
सर्वांभूती देव प्राण । साक्षात्कार ।।१४।। 

चिलीम ही तुझ्या करी । धूर सोडी ही अंबरी 
ऊर्ध्व दृष्टी तशी करी । उपदेशी ।।१५।। 

दिगंबरा निर्विकारा । धैर्यधरा तदाकारा 
मूर्तिमंत हे ओंकारा । नमस्कार ।।१६।। 

तुझे नाम गजानन । विघ्ने करी निवारण 
अंतरी या प्रकाशून । पुढे नेई ।।१७।। 

चालवी तू उपासना । नित्य बोधी माझ्या मना
सत्याच्याच आचरणा । मला लाव ।।१८।। 

आत्मनिंदा महापाप । आत्महत्या महापाप 
औदासिन्य महापाप । नको नको ।।१९।। 

तुझी प्रीती निरांजन । तेवो मनी गजानन 
विकल्पांना पिटाळून । लाव देवा ।।२०।। 

प्रसादाचे दिले दान । रामा दिले पदी स्थान 
येथे प्रचीती प्रमाण । दिली खूण ।।२१।। 

।।श्रीगजानन महाराज की जय।।

 रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

निरोप द्या या गजानना..

समाधी काळ जवळ आला हे संतांना आतूनच कळते. देवाघरचे निमंत्रण त्यांच्या मनाला सर्वात   आधी जाऊन पोचते. गणेश चतुर्थी आली! गरगर श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाली. चैतन्याने रसरसलेली मूर्ती काहीजणांचा गणपती दीड दिवसांचा असतो. श्रीमहाराजांनी ऋषिपंचमी हाच दिवस ठरवून टाकला आणि सगळ्यांचा निरोप घेतला.

प्रसाद द्यावा प्रसाद घ्यावा 
जावे आनंदाच्या गावा 
गजानन निघे निजसदना 
निरोप द्या द्या गजानना 

०००0000०००

सरे चतुर्थी येत पंचमी 
मान द्यावया निमंत्रणा 
निरोप द्या या गजानना!ध्रु. 

देह यायचा देह जायचा 
हा सृष्टीचा नियमच साचा 
सहज आणला निदर्शना!१

इथेच आहे मजला स्मरता 
दे अनुभव ती भाविकता 
लागा लागा हरिभजना!२
 
आनंद आदि आनंद अंती 
उगा कशाला करता खंती? 
जोड कृतीची द्या वचना!३

रामकृष्ण ही आले गेले 
नाम तयांचे तसेच ठेले 
नामच दाविल गजानना!४
 
श्रीगजानन जय गजानन 
गाता गाता भरले लोचन 
गंध आगळा सुमनांना!५ 

प्रसाद द्यावा प्रसाद घ्यावा 
जावे आनंदाच्या गावा 
गजानन निघे निजसदना!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीत गजाननमधून)


Saturday, August 22, 2020

मंगलमूर्ती सगळ्यांचा..


मूर्ती येऊ दे, जाऊ दे 
गणपतिबाप्पा नित्याचा 
हृदयी वसला, मनात ठसला 
मंगलमूर्ती सगळ्यांचा !ध्रु 

हा नांदे मूलाधारी
योग्यांना रुचला भारी 
उगम असे वक्तृत्वाचा !१

लंबोदर श्रीगजानन 
भालचंद्र हा त्रिलोचन 
आदर्शच नेतृत्वाचा !२

सूक्ष्मदृष्टी कशी असे? 
घेत दूरचे कानोसे 
हा तर राजा रसिकांचा!३
 
मूषक अंकित झालासे 
वाहक त्याला बनवि कसे ?
आश्चर्यच आश्चर्याचा !४

नित्य साधता संवाद 
मिलिंद सेवी मकरंद 
नायक अथर्वशीर्षाचा!५ 

म्हणा मोरया मोरया 
गेले सारे दुःख लया 
ठेवा ब्रह्मानंदाचा!६ 

चैतन्याचा हा गाभा 
निष्प्रभ करतो इंद्रसभा 
हा नंदन शिवगौरींचा !७

रचयिता श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.९.२००४

बाप्पा!

तू जागविशी आम्हा बाप्पा, आम्ही जागतो

प्रेमभराने आम्ही बाप्पा वंदन तुज  करतो 

मनास वळवून अंतरि बाप्पा तूच तूच शिकविशी 

आंघोळीला जाऊन या रे बाप्पा तू सुचविशी 

तनमन निर्मळ बघता बघता बाप्पा जादूगार! 

भल्या पहाटे यावे हिंडुन बाप्पा सुचवी छान 

बाप्पा म्हणजे मंगलमूर्ती गणपति हे पटले 

तजेलदार ही बाप्पा तुजसम होऊ या वाटले 

सवंगडी तू आम्हा मुलांचा बाप्पा हे नाते 

आधी, आता, नंतर बाप्पा कायमचे असते 

संगीताची गोडी बाप्पा गाण्यातुन लावली 

अक्षर घटवुन घेउन बाप्पा रेखिशी रांगोळी 

आनंद असतो हातामध्ये, बाप्पा मोदक वदे 

मनावरी ठेवा रे अंकुश बाप्पा कोण वदे?

चिखलातुन उगवले कमळ ते बाप्पा करि घेशी

दाह शमविती ऐशा दूर्वा बाप्पा शिरि धरशी 

ओंकाराचे प्रतीक बाप्पा त्यातुनही दिसशी 

ओवी, अभंग यातुन बाप्पा तू ऐकू येशी 

बाप्पा बोधहि ऐसा करशी समाजात मिसळा 

एक विसावा तू सगळ्यांचा बाप्पा हे कळले 

एकवीस ओळींचे स्तवनहि बाप्पा तू  लिहविले


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

१७.८.२००४

श्री



मनी 'गणपति', लिहावयाला, एकच अक्षर श्री पुरे!

शुभारंभ विद्येचा झाला, पहावयाला श्री पुरे

सुबक आकृती, प्रसन्न वृत्ती, स्मितहास्याला श्री पुरे

रंगावलि रेखाया स्फूर्ती, आत उपस्थित श्री पुरे

'मी नच कर्ता', बिंबायाला, श्रींची इच्छा भाव पुरे

श्री ही लक्ष्मी, गणेश ही श्री, समाधान धन पुरे पुरे

हत्तीवर अंबारी मधले डौलदार श्री खरेखुरे

चला उठा, कार्याला लागा, उत्तेजन श्री दे निकरे

शूरामागे सगळे शुभ ग्रह श्री देती यश सार खरे

साहसात श्री, प्रयत्नात श्री, अनुभूतीचे बोल खरे

आत्म्यावर विश्वास हेच श्री, देहदुःख फसवेच बरे

सौभाग्याचे प्रतीकही श्री, मुळारंभ  श्री खरे खरे

सत्य असे श्री, शिव सुंदर श्री चिंतन निर्झर झरे झरे

ज्ञानाचा ये रवि उदयाला कृपाच श्रींची तिमिर सरे

जनात मिसळा, हसा, बागडा श्री म्हणजे स्वातंत्र्य खरे

सरला श्रावण येत भादवा श्रींच्या शिरि दूर्वाच तुरे

नर्तन गायन वादन अभिनय श्रींना रंजन सुखद बरे

प्रवचन कीर्तन श्रींच्या पुढचे उद्बोधन लहरे बहरे

स्वसंवेद्य श्री, आत्मरूप श्री, ज्ञानेशा जाणवे खरे

जशी अथश्री तशी इतिश्री साम्य गोड गहिरे गहिरे

अतुल अमित नि अमोल हे श्री राम तयांचे चरण चुरे


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२५.८.२००४

गणपति बाप्पा ये प्रतिवर्षी

गणपति बाप्पा ये प्रतिवर्षी
मुलामुलींशी खेळायला!ध्रु. 

ओळख होते अक्षरातुनी
वळणदार ओंकार पाहुनी
उच्चाराने श्रवण नि दर्शन
ना तुलना या गमतीला!१

कोणी तुजला श्री म्हणताती
विघ्न हराया समर्थ वदती
अथर्वशीर्षाचे आवर्तन 
शिकवी जीवन जगण्याला!२

पाशांकुश ही दोनच शस्त्रे
झुळझुळीतशी दोनच वस्त्रे
गुणगंभीरा हे रणधीरा
शब्द न पुरती स्तवनाला!३

निराकार साकार तसा तू
प्रणवाचा उच्चार तोच तू
संगीतातुन चित्रकलेतुन
ओळख होते आम्हाला!४

आनंद तू येताजातांना
हवाहवासा असा पाहुणा
तुझ्यासारखी प्रसन्नता दे
बाप्पा अवघ्या विश्वाला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
३.९.२००१

ॐ गं गणपतये नमः

 ॐ गं गणपतये नमः! ध्रु. 
 
मंगलमूर्ती मनात भरली
मिटल्या नयना सुरेख दिसली
बोल स्फुरले नमो नमः!१

तन देवालय, मन गाभारा
अर्थ आगळा या ॐकारा
सहजसमाधि जमे पहा!२

मस्तकावरी हिरव्या दूर्वा
तनी लालिमा हसली पूर्वा
अरुणोदय सुखवितो अम्हां!३

अथर्वशीर्षाचे आवर्तन
अध्यात्माचे यातच शिक्षण
बीज सान परि वृक्ष महा!४

मंगलमूर्ती तुझी आरती
मनास सुखवी दिवसा राती
संजीवक हा मंत्र महा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.६.२००१

गणपतीची भूपाळी

ऊठ उठ मोरया, सरली निद्रेची वेळा
लाव लाव भजना, दयाळा प्रभो जगत्पाला!ध्रु. 

बाप्पा तुज म्हणता नाते सुंदरसे जडते
कर नकळत जुळती मस्तक झणी नम्र होते
मनपण घालव रे, नमन तुज विश्वचालकाला!१

शुंडा तव वळते तसे तू वळव मना आत
पाश तुझा टाक, बांध या गात्रा नियमात
समरसता लाडू दे प्रभो नित्य साधकाला!२

करी मना शांत, वास ना वासनेस राहो
मंगलमूर्ती तू कृपा या दासावर होवो
पुनर्जन्म नित्य, हवे बळ साधन घडण्याला!३

स्वरूप आनंद नांदतो कसा आत आत
अनुभवता खुलतो भाविका अनंत हा पंथ
पावसि परमेशा श्रद्धा दे चरणी अमला!४

तू तारी मारी करिशि जे त्यातच कल्याण
श्रीरामा नसते पडत ती कशाचीच वाण
दूर्वादल माथी हरित ते सुखवी सकलाला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.२.१९९८

Tuesday, August 18, 2020

मंगलमूर्ती मोरया, गणपति बाप्पा मोरया...

मंगलमूर्ती मोरया
गणपति बाप्पा मोरया!ध्रु. 

मूर्ती आपली मातीची
जोड लाभली तेजाची
जो तो पडताहे पाया!१

लुकलुकती इवले डोळे
तुम्ही जाणता मनातले
कसे जगावे शिकवा या!२

उपासना ती सूर्याची
सहजसाधना योगाची
स्थैर्य मनाला देण्या या!३

अंकुश जर का मनावर
प्रसन्न होतो रमावर
गानकला शिकवाया या!४

शस्त्रे धरता हाती ती
अबला ही सबला होती
युद्धकला देण्याला या!५

शुभ चिंतावे अशुभ पळे
अवघड विषयहि सहज कळे
समरसता शिकवाया या!६

शेती उद्यम व्यापार
दक्ष त्यामधे असणार
वैभवशिखरी न्या हो न्या!७

बाप्पा तुम्ही सगळ्यांचे 
बाल युवा अन् वृद्धांचे
घरात अपुल्या या हो या!८

गणेश म्हणजे आनंद
युगायुगांचा संबंध
ते नाते जपण्याला या!९

विवेकशुंडा आत वळे
आनंदाचा उगम कळे
मना अंतरी नेण्या या!१०
संघटनेचा द्या मंत्र
प्रेमाचे बळकट सूत्र
ऐक्यभाव फुलवाया या!११

प्रतिवर्षी आपण येता
वाढविता ही आतुरता
आकर्षण शिकवाया या!१२

काम असे करवुन घ्यावे
जरा न आपण गुंतावे
अनासक्त करण्याला या!१३
नित्य आरती रंगतसे
उधाण उत्साहास असे
उल्हासा वाढविण्या या!१४

पूर्वनियोजन कामाचे
रहस्य ऐसे सुयशाचे
वेळापत्रक शिकवा या!१५

कणाकणाने रास बने
क्षणाक्षणाने युगहि बने
सातत्यहि ते द्या हो द्या!१६

येताना वा जाताना
हसवायाचे सगळ्यांना
तत्त्व खोलवर रुजवा या!१७

तुम्हासारखा अनंत कोण
तुम्हासारखा दाता कोण
अथर्वशीर्षा शिकवा या!१८

काळाला मूषक केले
वाहन उपयोगी ठरले
सदुपयोग वेळेचा द्या!१९

पाची तत्त्वांचा मेळ
किती रंगला हा खेळ
तीच खिलाडूवृत्ती द्या!२०

जे वाचावे समजावे
कृतीत ते ते उतरावे
श्रीरामाला संगे घ्या!२१

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गणेश चतुर्थी १९९६

Friday, August 14, 2020

श्रीकृष्णा रे तुजविण कोण?

घन अंधारी संकट भिववी
भयकंपित मन घशास सुकवी
घडीघडी ते जिवास रडवी
धीर द्यावया कुणा बोलवू 
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १

अधरी मुरली तू धरलेली
हळवी फुंकर श्रवणी आली
सर्व इंद्रिये आसुसलेली
तनुची मुरली करुन वाजविल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? २

मला वाटते अर्जुन व्हावे
अवधानाचे दानच द्यावे
सर्व सुखा सत्पात्र बनावे
अभाविकाला भाविक करण्या
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ३

हे माधव हे तुझेच लाघव
तूच मला चरणांशी बैसव
मला परत दे माझे शैशव
सुदाम पेंद्या बनविल मजला
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ४

दोष तुला तरि कैसा द्यावा
भोग भोगुनी सहज सरावा
संतांचा तर हा सांगावा
अनुभवांनी ज्ञान पुरविता
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ५

भाग्यच माझे संकट येते
पदोपदी मज सावध करते
चपळ मनाला आत वळविते
गुरुकृपाही समजविण्याला
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ६

व्यक्ती पांडव समाज माधव
धर्मास्तव तर सगळे बांधव
जे जे दुर्गुण ते ते कौरव
खलनिर्दालन करील ऐसा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ७

भक्ताचा हा धावा ऐकुन
धीर द्यावया येई आतुन
सुचेल तैसे घे घे लिहवुन
आचरिण्याला युक्ती शिकविल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ८

आई दणके जरी घालते
राग विसरते लाडू देते
हलक्या हाते मग थोपटते
अंगाई सोsहं गाणारा 
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ९

कर्तव्याचे भान असावे
विकारवश मी कधी न व्हावे
मी माझे हे लयास जावे
वरप्रार्थना स्मरणी आणिल 
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १०

श्रावणमासी पहिल्या दिवशी
अंतरात या कैसा येशी?
मला कृपांकित नकळत करशी
अवघड सगळे सोपे करवी
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ११

देहदुःख सुख मानत जावे
मनास अपुल्या उलट करावे
नाम निरंतर गावे ध्यावे
मन पवनाला जोडिल ऐसा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १२

गीतावाचन गीताचिंतन
गीताचिंतन गीतादर्शन
गीतादर्शन भक्तोद्धारण
गीतामृतनवनीत द्यावया
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १३

मूर्तीमध्ये दर्शन घ्यावे
जनी जनार्दनि त्यास पहावे
अनुसंधाना तुटो न द्यावे
जीवनशिक्षण शिकवी मजला
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १४

सुखदुःखेही येती जाती
सहन करावी ओळखुनी ती
शहाणे न कधि करती खंती
वज्रासम तन करील ऐसा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १५

कंटाळा हा शब्दच घालव
उत्साहाचे अपूर्व वैभव
देउनि नैराश्याला घालव
लोहाला या सुवर्ण बनवी
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १६

देह द्वारका ध्यानी आले
मनसिंहासन तुला अर्पिले
अश्रूंनी तव चरण भिजविले
नित्याचा वास्तव्या येई
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १७

तू कर्ता रे तूच करविता
तू असशी मायेच्या परता
कोटि कोटि वंदने अच्युता
मानसपूजा मानुन घेइल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३.८.१९८९

Thursday, August 13, 2020

कृष्णभैरवी

तूच आपण, शब्द सुचवुन, गीत जुळवुन ऐकवी
कृष्णरंगी रंगवावी श्रीहरी रे भैरवी!

काय झाले या मनाला, शांतवावे त्या कसे?
मोरपीसच हास्य कृष्णा, या मना शिकवू कसे?
मोहना हे पूर्णकामा या मनाला बोधवी!

देह गोकुळ, चित्त व्याकुळ, कृष्ण ना कोठे मिळे
जे खरे माझ्याचपाशी ते न का मजला मिळे?
ही अहंता ने लयाला, भेद सगळा घालवी!

गोकुळी या भक्ति राधा माय होती वत्सला
जन्मदा ना, नवल कैसे नंदनंदन हासला
ते निरागस सौख्य लाभे जीवनाच्या शैशवी!

कृष्णनामा आळवीता कंठ प्रेमे दाटतो
भरुनि येती फिरुन डोळे पूर वाहू लागतो
हे मुकुंदा भाववेड्या भाविकाला बोलवी!

इंद्रियांचा हा पसारा आवरावे त्या कसे
बासरी तू वाजवी रे, गोधना जमवी कसे
संयमे साधे समाधी संगती कृष्णा हवी!

श्रावणाचा मास ऐसा होतसे तव आठव
आठवा तू, आठवे तुज, तिमिर सगळे घालव
शरद ऋतुचा चंद्र जैसा हास्य वदनी खेळवी!

कर्म माझे मी करावे दे परी तू प्रेरणा
कृष्ण कर्ता, फलहि त्याला जागवी ही भावना
चिंतनाने घरच मंदिर स्वप्नपूर्ती ती हवी!

"देह नच मी, तोच आत्मा" ना उपाधी कोणती
दुःख नाही, सुखहि नाही वेगळी ऐसी स्थिती
तू तुझी गीता मुकुंदा मम मुखातुन ऐकवी!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.८.१९८९

Wednesday, August 12, 2020

गोपाळकाला

गोपाळकाला, गोपाळकाला, गोपाळकाला रंगला
"गोविंद, गोविंद, गोविंद" कल्लोळच उठला

गाठोड्यांचे आम्हास ओझे
हात मोकळे श्रीकृष्णाचे
गाईंमागे कसा गुराखी चाले मनमोकळा

किती खेळलो कळले नाही
किती हासलो भानच नाही
'मी माझे' चा विसरच पडला नकळत आम्हांला

दूध न पोचावे दुष्टाला
संधि न देणे उपभोगाला
कशी इंद्रिये रमवावी ती श्रीहरि शिकवी भजनाला

चला शिदोरी करा मोकळी
चला मने पण करा मोकळी
समरस व्हावे, खावे, गावे असा जागवा जिव्हाळा

श्रीकृष्णाला मधे घेतले
अति प्रेमाने तया भरवले
आत्मानंदहि असाच असतो कळले कळले आम्हाला

विभक्त होण्या अवसर नाही
कपट करावे मनात नाही
देवापासुन काय दडतसे? देवच हाती सापडला

हरि घुमवितो कशी बासरी
अंगांगावर उठे शिरशिरी
गोधनही ते येते धावुन हाक पोचली आत्म्याला

सुखदुःखांनी मिश्रित जीवन
विविध रसांचे तैसे भोजन
चवीचवीने सेवन करता काला कृष्णाचा कळला

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.८.१९८९

Thursday, August 6, 2020

सियावर रामचंद्र की जय..

सियावर रामचंद्र की जय!
सियावर रामचंद्र की जय!

रामकथा सचमुच सुरसरिता
जो कोई लिखता, पढता, सुनता
पल में पापविलय!

आंजनेयजी आपही आते
घर घर को वह अवध बनाते
सज्जन सब निर्भय!

सियाराम माँ बाप हमारे
भाविक हैं प्राणों से प्यारे
अतिपावन आलय!

तानपुरा लेकर हाथो में 
गाओ नाचो बडी खुशी में
बंधन बस स्वरलय!

तुलसीदास की कृपा भई हैं
सपरिवार राम आए हैं
सुभग सुभग प्रत्यय!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

हरे राम, हरे कृष्ण

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे!ध्रु.
 
तू इथे तू तिथे  ज्ञान हे होउ दे
राम तू कृष्ण तू गान हे गाउ दे
राघवा यादवा सन्मती देइ रे!१

देह हा यायचा देह हा जायचा
स्वस्वरूपि राहणे बोध हा घ्यायचा
हे मना तू सदा नामछंद घेइ रे!२

हे मना चाप तू राम वाकवो तुला
हे मना वेणु  तू श्याम वाजवो तुला
एवढे ऐक रे मीपणा हटवि रे!३

इंद्रिये जिंकली मारुती मुक्त तो
कृष्ण तो जाणला पार्थ ही धन्य तो
अंतरी जाउनी तू तया शोध रे!४

राम तो श्रीहरि हे मना होय ना
कृष्ण तो श्रीहरि हे मना होय ना
भक्ति ही बाणता वासना जाइ रे!५

मारुती जो असे श्वास तो जाहला
नाम त्या जोडुनी रंगवी सोहळा
जे दिसे पाहणे नेत्र तू मीट रे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०७.१९९०

श्रीराम आणि श्रीकृष्ण

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे आणि असीम श्रद्धेचे विषय आहेत आणि आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.  

आत्मा हा जणु श्रीराम आहे तर व्यवहार श्रीकृष्ण..
-------------------------------------------------------------------
मम 'आत्मा' श्रीरामच गमला
व्यवहारी श्रीकृष्ण प्रकटला!ध्रु.

'राम कृष्ण हरि' वदे वैखरी
आनंदाच्या उसळत लहरी
इथे तिथे भगवंत भेटला!१

'सत्य' काय श्रीराम सुचवितो
'धर्म्य' काय श्रीकृष्ण घडवितो
कर्म वाटते यज्ञ मनाला!२

प्रभातकाली राम जागवी
आणि दिनांती कृष्ण जोजवी
दिवस सार्थकी असा लागला!३

'भाषण' सुमधुर श्रीरामाचे
'कुशल कर्म' ते श्रीकृष्णाचे
सुयोग सुंदर जुळला जुळला!४

परमार्थाची राम प्रेरणा
प्रपंचात श्रीकृष्ण चालना
दोहोंचाही मेळ साधला!५

मानव कैसा राम पहावा
कसा अग्रणी कृष्ण पहावा
'राम कृष्ण हरि' मंत्र मिळाला!६

'रामायण' घर मंदिर बनवी
जीवनविद्या गीता शिकवी
राम कृष्ण गुरु विश्वा सकला!७

अंतःकरणी तत्त्व स्फुरते
ते मुरता वर्तनी प्रकटते
मुक्तीची ही अशी शृंखला!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.८.१९९१

Wednesday, August 5, 2020

रामजन्म

मनात राम जन्मला
तनात राम खेळला!ध्रु. 

नामरूप राम तो
रामदास सांगतो
राम लावितो लळा!१

'मी न देह' जाणवे
'मी न बुद्धि' जाणवे
बोध मोदवी मला!२

राम हा इथे तिथे
मीहि तोच वाटते
ध्यास लावि सावळा!३

का निराश व्हायचे ?
रडायचे? अडायचे?
यत्न देव थोरला!४

रामरंगि रंगणे
मोहपाश भंगणे
असाच राम जन्मला!५

राम जागवी मला
राम बैसवी मला
कंठ आज दाटला!६

मुक्तिलाभ होतसे 
नित्य भेट होतसे
काय वानु सोहळा!७

समर्थयोग राम रे
समर्थभक्ति राम रे
देहभाव लोपला!८

पुढे पुढेच जायचे
का कुणास भ्यायचे?
निश्चयो असा भला!९

सोबती असो, नसो
ध्येय जे मनी ठसो
क्रमीन पंथ एकला!१०

नित्य राम जन्मतो
मजसवेच बोलतो
ध्यानछंद लागला!११

भाग्यवंत मी असे
रामदास होतसे
शीत वाटती झळा!१२

जोम जीवनी मिळे
भक्तिरोपटे डुले
अश्रुपूर लोटला!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.४.१९८७

Tuesday, August 4, 2020

पतितपावन श्रीराम.


पतितांना पावन करी, असा श्रीराम एक भूवरी!ध्रु. 

तळमळ तळमळ निशिदिनि होते
रामभेटीची ओढ लागते
चरणस्पर्शे पावन झाली सती अहल्या खरी!१

पश्चातापे तनमन पोळे
शांत कराया अश्रु धावले
पातक सगळे धुवून टाकुन रामचंद्र उद्धरी!२

संतसंगती राम देतसे
उत्कर्षाचा मार्ग खुलतसे
झाले गेले ते गंगार्पण वास राम मनि करी!३

प्रत्येकाला भविष्य आहे
घडवायाची संधी आहे
निराशेतुनी फुलवी आशा स्वामी भवभय हरी!४

टाकीचे आघात सोसणे
जसे घडवितो तैसे घडणे
पाषाणातुन मूर्ति प्रकटे कारागिरी ही खरी!५

चुकता चुकता शिकता येते
पडता पडता बाळ चालते
करुणासागर राममाउली बालकास सावरी!६

संकट असते एक कसोटी
धैर्य लाभते श्रद्धेपोटी
खचू न देई जराहि हिंमत नाम स्मर अंतरी!७

धीर धरी रे धीरापोटी
असती मोठी फळे गोमटी
कवि केशवसुत सांगुन गेले चिंतन त्यावर करी!८

नियमांनी मन बांधुन घ्यावे
व्रती बनावे तपी बनावे
निश्चयबळ ते वाढत जाते घे घे अनुभव तरी!९

हवी दक्षता क्षणाक्षणाला 
काय करी विषयाचा घाला
संरक्षक श्रीराम भरवसा संतत हृदयी धरी!१०

कर्म न टळते कधी कुणाला
निजकर्माचा का कंटाळा?
परिश्रमाने जीवन घडते पाठ गिरव तू तरी!११

अंधारातुन प्रकाश उमले
हलके हलके पूर्वा उजळे
गगनसदन तेजोमय बनते रवि येता अंबरी!१२

अशाश्वताचा मोह नसावा
शाश्वत त्याचा ध्यास असावा
विवेकबंधू तुझा सोबती तुजला सोबत करी!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, August 2, 2020

हे श्लोक पाच तू नित्य वाच..

'मी देह नव्हे, मन बुद्धि नव्हे'
हे पुनःपुन्हा घटवावे - 
'चल मना उंच, गगनात राम'
मन अभ्यासात रमावे!१

सद्गुरु आत विश्वात तोच
ही श्रद्धा तर अनमोल
तू भाग्यवंत जगतात सत्य
तो सावरि ढळता तोल!२

जे घडे त्यात कल्याण असे
अंतरात कोरुन ठेवी
भय लेश नको, शंकाहि नको
जगि निष्ठावंत सुदैवी!३

इंद्रिये द्वाड करु नको लाड
घे संयम थोडा शिकुनी
जो आत वळे त्या हरि मिळे
हरिपाठ पहावा जगुनी!४

नैराश्य नको, आलस्य नको
बन मनुजा तू उद्योगी
दिस नित्य नवा, क्षण नित्य नवा
उत्साह तुला उपयोगी!५

हे श्लोक पाच तू नित्य वाच
तव दृष्टिकोण बदलेल
जाशील जिथे रमशील तिथे
जगि हवा हवा होशील!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१.६.१९९१

Saturday, August 1, 2020

बोला जय जय जय हनुमान...

राम राम गाता गाता मन झाले बेभान
बोला जय जय जय हनुमान!ध्रु. 

श्रीरामाचा पहिला दास, स्वामीसाठी श्वास नि श्वास
रामा जीव की प्राण!१

उंच उंच हे मन मग गेले प्राणांमध्ये नाम मिसळले
तेच तेच हनुमान!२

रविबिंबाला गगनी पाहुन असे वाटले घ्यावे कवळुन
ध्येयास्तव उड्डाण!३

गोटिबंद हे शरीर व्हावे, कार्य कराया समर्थ व्हावे
वज्रासम बलवान!४

ज्या त्या हृदयी वसला राम असे अनावर झाले नाम
नम्र तोच बलवान!५

पवनापासुन वेग घेतला श्वासातुन विश्वास लाभला
रघुनाथाची आण!६

दुःख नि चिंता भुते पळाली, कर्तव्याची स्फूर्ति मिळाली
बजरंगी वरदान!७

राम भजावा जीवेभावे नसे राम ते फेकुन द्यावे
भक्तीचे महिमान!८

श्रीरामाचा असा जिव्हाळा, सागर तर ओलांडुन गेला
अजिंक्य वीर महान!९

सीता छे आईच भेटली, सर अश्रूंची झरली गाली
ऋणानुबंध महान!१०

द्रोणागिरि ये सहज पेलता श्रीरामाचा शब्द झेलता
सज्जन गाती गान!११

नमस्कार सूर्यास घालता बालपणी ये तनी वज्रता
शक्तीचे महिमान!१२

श्रीरामाचा दूत बनावे श्रीरामाचे कार्य करावे
अनुसरणे हनुमान!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 30, 2020

जय जय राम कृष्ण हरि..१

जय जय राम कृष्ण हरि! ध्रु.

जाता पंढरीच्या वाटे
आसू गाली, कंठ दाटे
माहेराची ओढ भारी!१

माळ तुळशीची गळा
पिके भक्तीचाच मळा
नभी भिडती लकेरी!२

कुणी छेडतसे वीणा
घनु वाजे घुणघुणा
कानी हरीची बासरी!३

बाळकृष्ण पांडुरंग
रुक्मिणीचाच श्रीरंग
मने देखिली पंढरी!४

ध्यान लागले लागले
रूप पाहिले सावळे
ब्रह्म ठाके विटेवरी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.५.२००४

Tuesday, July 28, 2020

बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा..

विटोनी प्रपंचा जातो भंडारा डोंगरी
वृक्षवल्ली होती तेथे सोयरी धायरी
पक्षि गोड गाती तेथे गाणे विठ्ठलाचे
ताल देत त्या गाण्याला झरा गोड हासे
भासे रूप भगवंताचे तृणांकुरामाजी
रोम रोम फुलतो देही तुका हो विदेही
पंगुलागीं फुटती पाय मुक्यालागी वाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

धरा तप्त बघता येते गगन की भरोनी
वर्षुनिया अमृतधारा धरेलागी न्हाणी
बीज एक धरणी घेते कोटि फळे देते
पानफुलांनी वनराई फुलोनिया येते
वाटसरा देते छाया सोसुनिया ऊन
अनाथास द्यावी माया व्हावे पांघरूण
ऊब देत उघड्या साहा कडाका हिवाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

दीड वीत पोटासाठी किती आटाआटी
राख चिमूट देहाची व्हायची शेवटी
बैल जुंपला घाण्याला  फिरे तो गरारा
आस पिशाच्ची रे तुजला ओढते फरारा
कोण बायका नी पोरे बंधनार्थ दोरे
खुळ्या मानतोसी त्यांना नभांगणी तारे
एक आप्त पांडुरंग देव हा तुझा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

विठ्ठल सावळा आहे मळा लावण्याचा
काय वानु रूप त्याचे शिणे मात्र वाचा
कासे कसे पितांबर पांघरून शेला
युगेयुगे वीटे वरी हरी उभा ठेला
पालवितो भक्तां हाते सखा पांडुरंग
करा गजर नामाचा होउन निःसंग
बिंदु बिंदु मिळुनी अंती सिंधु व्हावयाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

नको सोडण्या संसार नको राख अंगा
नको उपास तापास भजा पांडुरंगा
पराविया नारी माना रुक्मिणी समान
सकल जीव ते भगवंत देव नाही आन
देह हा पंढरी आणि - आत्मा हा विठ्ठल
कामक्रोधकचरा झाडा व्हावया निर्मळ
बघा अतरंगी अपुल्या नाथ पंढरीचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

कुणी निंदो अथवा वंदो मना भान नाही
फोडुनी भांडार म्हणवी स्वतः मालवाही
शुद्ध धरोनीया भाव तुका वाढलाहो
कळवळोनी धावे देव ऐकुनिया टाहो
जीवशीव मिळले येथे इंद्रायणीमाजी
साक्ष देत अजुनी राहे उभी वनराजी
डोहा डोंगरात घुमतो नाद या पदाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 23, 2020

बाळ जाहला बळवंत..

मुलाच्या नाजूक तब्येतीची मातेला काळजी वाटायची.
पण श्रेष्ठ मनोबलाच्या आधारे कॉलेजचे पहिले वर्ष टिळकांनी शक्ति संपादनासाठीच खर्च केले. शारीरिक दुर्बलतेचे नाव देखील उरले नाही.  बाळाचा "बळवंतराव" झाला ...

नसेच दुनिया कमजोरांची
जगी मात हो बलदंडांची!
पाया भरभक्कम शक्तीचा
त्यावर इमला कर्तृत्वाचा
बाळ मनस्वी याच विचारे
घुमे तालमित दिनरात- बाळ जाहला बळवंत!

शरीर तर धर्माचे साधन
करण्यास्तव सत्त्वाचे रक्षण
शक्ती आधी, नंतर विद्या
आपत्तींशी झुंज झुंजु द्या
जोर काढुनी मारुनि बैठक
शड्डु ठोकिती झोकात- बाळ जाहला बळवंत!

अंगांगातुनि रक्त सळसळे
हृदयातिल चैतन्य खळाळे
नमस्कार सूर्यास घालिता
भूमीवरती चित्र उमटता
भिंतींना देताक्षणि धडका
हादरती त्या कंपात- बाळ जाहला बळवंत!

जे जे खावे पचुनी जावे
शरीर गोटीबंद दिसावे
आग भुकेची पोटी उठता
दूध चरविभर देत शांतता
बळकट पिंडऱ्या भरीव छाती
स्नायु जसे की पोलाद- बाळ जाहला बळवंत!

जली वाहत्या उडी ठोकावी
एका हाती भाकर खावी
या तीराहुन त्या तीराला
अनेक फेऱ्या मारित जाव्या
पहिले वर्षच दिले तालमिस
जगाआगळी ही रीत- बाळ जाहला बळवंत!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 19, 2020

नाम तुझे या ओठांवरती..

श्रीरघुनाथा, हे भगवंता,
जागविलेसी मला प्रभाती
नाम तुझे या ओठांवरती! ध्रु.

झाले गेले ते विसरावे
अनागता सामोरे जावे
नित्य नवा दिस नवी जागृती!१

माझे मजला कळती अवगुण
तूच टाक ते अवघे निपटुन
नामच गंगा स्नानासाठी!२

उठता बसता तुझी आठवण
अशी कृपा तव तूच दयाघन
श्रद्धेची दे हाती पणती!३

हलक्या हाते अश्रु पुसावे
जन रिझवावे जन सुखवावे
परमविसावा संतसंगती!४

काय धनाचे मूल्य मुनिजनां?
द्रव्यलोभ तर उडवी दैना
तुझे स्मरण संपत्ती मोठी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.७.१९९५

ऑडिओ लिंक : नाम तुझे या ओठांवरती

Saturday, July 18, 2020

नाम हेच 'राम' समज, उमल आतुन..

अर्थ भरी जीवनात करित 'चिंतन'
नाम हेच 'राम' समज, उमल आतुन!ध्रु.

मी न देह, मी अनंत आदि मध्य ना
मज न जन्म, मज न मरण शुद्ध भावना
सवड काढ भजनास्तव मोजके क्षण!१

'हरि हरि' म्हण वासनेस वाव ना मुळी
वेणुनाद सोsहम् तो भरत पोकळी
भक्तिरंग खुलवितसे मनुज जीवन!२

जो स्वतःत, तो जगात एकरूपता
जातिभेद, पंथभेद पूर्ण अज्ञता
तोच धन्य जो करीत धर्मपालन!३

आलो मी जिथुन तिथे जायचे मला
पाहुणाच म्हणुन इथे वागणे मला
'मी, माझे' जात लया तयास जाणुन!४

दासबोध आत्मशोध तोच घे करी
ज्ञानदीप ज्ञानदेव लावतो घरी
श्रवण, मनन भरत सहज जे उणेपण!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.२.१९९५

भगवद्गीते..

प्रभातकाली भगवद्गीते घडवुन घे पठण
कर्तव्याचे सर्व साधका आणुनि दे भान!ध्रु.

विषाद होतो प्रसाद आणि समस्याहि सुटती
गुरुशिष्यांच्या संवादाची प्रत्यक्षच प्रचिती
तुझ्यासमचि तू आणू कुठले दुसरे उपमान!१

नश्वर त्याचा शोक व्यर्थ, तू अश्रू गे पुसले
शाश्वत त्याचा ठाव सांगुनी मना आत नेले
अंतरंगि श्रीभगवंताचे घडविलेस दर्शन!२

सुटे फलाशा तेव्हा बनते कर्मच कर्तव्य
कर्तव्याचे पालन घडता उजळे भवितव्य
मनःशक्ति दे माते, करवी धर्माचे पालन!३

विश्वरूपदर्शने हरविली, पार्थाची भ्रांती
कर्ता धर्ता श्रीहरि हर्ता तत्कालची प्रचीती
त्या रूपाते कल्पुनि करतो तुजलागी नमन!४

मनास उन्मन करते ऐशी दिली राजविद्या
तुझीच शिकवण यथायोग्य तू सकलांना वंद्या
श्रीरामाच्या वर्तनात तू घडवी परिवर्तन!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६.६.१९९९

विठ्ठल विठ्ठल नाम घेता नामदेव जागे, मन्‍मनी नामदेव जागे..

विठ्ठल विठ्ठल नाम घेता नामदेव जागे
मन्‍मनी नामदेव जागे
असे जाणवे एका वेळी विठ्ठल पुढती मागे ! ध्रु

नामासाठी जो अवतरला
नामी रमला नामे तरला
भक्ति वेढिते देवाभवती चिवट रेशमी धागे ! १

भाव ओतला मूर्ति हालली
नाम्‍यासाठी दूधही प्‍याली
अगाध लीला देवाजीची पिढी पिढीला सांगे ! २

मनास नामे उलटे केले
आत वळविले आत रमवले
सोSहं अनुभव येत भाविका सहज समाधी लागे 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

चिरा पायरीचा व्हावे..

पांडुरंग भेटीसाठी पंचप्राण कंठी येती –
बळ सारे हारपले देह लोटोनियां देती!ध्रु.

भाववेडा नामदेव
स्‍मरू लागे ज्ञानदेव
अदृश्‍याची ओढ जीवा, आतां पाहिजे विश्रांती ! १ 

आता पावलो पंढरी
दिसे सावळा श्रीहरी
वृत्‍ती झाल्‍या अंतर्मुख नाही उरली आसक्‍ती ! २

आषाढाचा धुंद मास
लावी वेधु मानसास
मूळ आले माहेराचे बाहे चैतन्‍याची मूर्ती ! ३

चिरा पायरीचा व्‍हावे
संतें वरी पाय द्यावे
काय पाहिजे आणीक? नको स्‍वर्ग नको मुक्‍ती ! ४

धाव पाव गे विठ्ठले
प्राण माझे व्‍याकुळले
आधारास दे गे हात हाका तरी मारू किती ! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, July 6, 2020

हर हर महादेव बोला!


छातीचा करुनी कोट आडवू सागरलाटेला
हर हर महादेव बोला!ध्रु.

धोंड्यांचा भडिमार करावा
गनीम गडगड लोळत जावा
परिसर हा रक्तात भिजावा
तलवारी, भाल्यांवर झेलू शत्रुचा हल्ला!१

महाराज, तुम्हि गडी पोचणे
अमुची चिंता मुळी न करणे
अमुचे होइल येथे सोने
तलवारीतुन अता आगिचा लाल लोळ चेतला!२

खिंडीमध्ये अडसर होतो
शिकस्त करुनी झुंज झुंजतो
सारी ताकद पणा लावतो
तोफांचा आवाज ऐकण्या बाजी आतुरला!३

देह पिंजला भले पिंजु दे
रक्त गळाले, गळो, गळू दे
परि आम्हाला यश लाभु दे
स्वराज्यसूर्या प्रसन्न हो परि तुझिया भक्ताला!४

पहिली तोफ उडाली धडडड
शांत जाहली मनिची तडफड
स्वराज्य राहो यास्तव धडपड
हर हर गर्जत बाजी भेदी अंति सूर्यमंडळा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 5, 2020

गुरुवंदना


श्रीगुरुपौर्णिमा

वन्दे श्रीवेदव्यासं सकलगुणनिधिं सादरं पूर्णिमायाम्।
अस्मिन् देशे खलु-स-महता पुण्ययोगेन जातः।
सत्कार्यार्थं परमविमलं जीवनं यस्य भूतम्।
भगवंतं तं सकलबुधजना  सादरं  संस्मरन्ति॥

अर्थ :
खरोखर या भारतात ज्यांचा जन्म पुण्यकारक योगाने झाला, अवघे जीवन सत्कार्यासाठी वेचले गेल्याने परमविमल ठरले,  सर्वच बुधजन ज्या भगवानांचे सादर स्मरण करतात त्या सकलगुणनिधी अशा श्रीवेदव्यासांना पौर्णिमेच्या दिनी मी सादर वंदन करतो.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, July 1, 2020

पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी !



पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी ! ध्रु.

देव आईबाप
सेविता सरे पापताप
भक्‍तीला भुलला भाबडा देव वाळवंटी ! १

गावच ही काशी
श्रेय त्‍या एका भक्‍तासी
प्राणमोल दिधले खिळवला जागी जगजेठी ! २

परब्रह्म शिणले
विटेवर युगे युगे हसले
सानथोर सगळे मनोमनि हेच हेच वदती !  ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५-७-१९७७

म्हणा विठ्ठल! विठ्ठल!

म्हणा विठ्ठल विठ्ठल (ऑडिओ)

म्हणा विठ्ठल! विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!ध्रु.

भक्तिरसात नहावे, भक्तिरंगात डोलावे
भक्तिजलात डुंबावे, भक्तिनभी विहरावे
तनामनात विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!१

टाळ वाजवा वाजवा, विठू बोलवा बोलवा
गीती आळवा आळवा, वाचे विठ्ठल वदावा
ध्यानामनात विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!२

देहभाव तुडवावा, देव देहात पहावा
पखवाज घुमवावा, आणा स्वरात गोडवा
मायबाप तो विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!३

लय गाण्यालागी येई, ताल मनालागी येई
गंध भक्तीलागी येई, चव भक्तीरसा येई
एक सोयरा विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
तोडी भजनी

Monday, June 29, 2020

साई स्तवन..

साई, हूँ मैं आपका, आप हमारे साई है।
जहॉं देखूँ तहॉं साई है, साई साई साई हैं।। १ ।।
आप हमारे रखवाले, कर्ता, धर्ता, भर्ता हैं।
ब्रह्मा, विष्‍णु, श्रीमहेशजी साई साई साई हैं।। २ ।।
धूप दीप नैवैद्य आप हैं पूजा पूजक पूज्‍य भी हैं।
आप ही श्रोता, आप ही वक्‍ता साई साई साई हैं।। ३ ।।
जल-थल में हैं, नभ में हैं, पवन आप का साक्षी हैं।
प्रकाश है तो रूप आपका ये सब साई साई हैं।। ४ ।।
शिरडी है गोकुल मोहन का मिट्टी का कण कहता हैं ।
साईस्‍पर्शसे पुनीत सब कुछ साई साई साई हैं।। ५ ।।
देह न हूँ मैं –आत्‍मतत्‍व तो निश्चित कालातीत हैं।
सोऽहं सोऽहं नाद अनाहत साई साई साई हैं।। ६ ।।
दृष्‍टी आपकी प्रेममयी है – करुणासे नहलाती है।
हृत्‍स्‍पंदनभी यही सुनाता साई साई साई हैं।। ७ ।।
‘प्‍यार करो रे, सब्र करो रे’ तन का कणकण रटता है।
शिरडी तन हैं मंदिर – आत्‍मा साई साई साई हैं।। ८ ।।
साई साई रटते रटते रोना हँसना बनता है।
ऊँचे स्‍वर में गायक गाता - साई साई साई हैं।। ९ ।।
जन्‍म न गर तो कैसी मृत्‍यु अजर अमर श्रीसाई हैं।
सर्वव्‍यापी, करुणासागर साई साई साई हैं।। १० ।।
साधक कैसे साईजी?  माधव का अवतार है।
हाथ जोडकर हम हैं कहते - साई साई साई हैं।। ११ ।।
साईमूर्ती है मनभावन व्‍यथा दुख बिसराती है।
दवा नाम है सब रोगोंका साई साई साई हैं।। १२ ।।
उदी सुगंधित पुलकित करती ध्‍यान सहजही लगता है।
अंदर शिवजी यही सुनाते साई साई साई हैं।। १३ ।।
हकीम साई, मैया साई, सद्गुरु साई साई है।
परब्रह्म सत्‍स्‍वरूप साई, साई साई साई हैं।। १४ ।।
अपना अपना काम करो गाओ भगवान दयालू है।
जिसे न कोई रखनेवाला उसका साई साई हैं।। १५ ।।
रोटी कपडा, कुटि हो छोटी चाह न मनमें दूजी है।
रहे हाथ ये सेवा में रत साई साई साई हैं।। १६ ।।
शिला नहीं सिंहासन है यह जिसपर साई बैठे हैं।
विश्‍वप्रेम का यही संदेशा साई साई साई हैं।। १७ ।।
श्‍वेत वसन ये साईनाथजी हृन्‍मंदिर में सोहत हैं।
जीवन का तो एक ही गाना साई साई साई हैं।। १८ ।।
पूजाविधि हम नहीं जानते मंत्र न हम को आवत है।
मंत्राक्षर बन बैठे मुँह में साई साई साई हैं।। १९ ।।
साईजीवन लीलासागर इस का जल तो मीठा है।
एक एक स्‍मृति मधुर आचमन साई साई साई हैं।। २० ।।
गद्दीपर बैठे जो साई ॐ स्‍वरूप ही लगते हैं।
श्रद्धा के जो सुमन चढाएं साई साई साई हैं।। २१ ।।
नयनों से झरते हैं ऑंसू वे तेजस्‍वी मोती है।
उन की माला उन्‍हें समर्पित साई साई साई है।। २२ ।।
साई शिव जी जागृत रहकर जीवन शिवमय करते हैं।
श्‍वासों के रुद्राक्ष हैं कहते साई साई साई हैं।। २३ ।।
अशिव जलाकर भस्‍म बना वह उदी हमारी प्‍यारी है।
उस का कण कण नवसंजीवन साई साई साई हैं।। २४ ।।
हृदयही बन्‍सी श्‍वसन नाद है बन्‍सीधर श्रीसाई हैं।
इंद्रिय गौऍं प्रेमांकित सब साई साई साई हैं।। २५ ।।
मेहेरबान हैं साई भक्‍तपर हाथ पकडकर लिखते है।
साई सद्गुरु बडे कृपालु साई साई साई है।। २६ ।।
गीतागायक माधव साई जीवन उन का गीता है।
ज्ञान कर्म और भक्ति सबकुछ साई साई साई हैं।। २७ ।।
रंजन अंजन, दुख का भंजन साई साई साई हैं।
सर्वेश्‍वर, योगीश्‍वर सद्गुरु साई साई साई हैं।। २८ ।।
गोदा गंगा शिरडी काशी श्रीसाई श्रीशंकर है।
गंगा का जल प्‍यास बुझाता साई साई साई हैं।। २९ ।।
जाति न पूछो, पंथ न पूछो यहॉं ज्ञान ही ज्ञान है।
प्रेम का दूजा नाम धरापर साई साई साई हैं।। ३० ।।
नीम वृक्ष के तले बैठकर चिंतन जिस का चलता है।
सुशांत मन से अंदर देखत साई साई साई हैं।। ३१ ।।
बहुत दूरसे आया जोगी निर्जन जिस को प्‍यारा है।
तपाचरणमें समय बिताते साई साई साई हैं।। ३२ ।।
कडी धूप हो या ठंडक हो गिरि के सम जो निश्‍चल है।
अमृत को बरसानेवाला साई साई साई हैं।। ३३ ।।
धरती शय्या नभ ही चादर साई निर्भय सोते हैं।
तन की चिंता जरा न जिस को साई साई साई हैं।। ३४ ।।
जन्‍मत्‍यागी श्रीसाईजी विरक्ति लेकर आये हैं।
तप के बलपर आत्‍मतृप्‍त जो साई साई साई हैं।। ३५ ।।
महाराष्‍ट्र की पावन भूमि संतचरणरज लेती है।
पेडों के पत्‍ते भी गाते साई साई साई हैं।। ३६ ।।
जहॉं रहे श्रीसाईनाथजी धर्मक्षेत्र बन पाया है।
गुरु की महिमा यही गरजती साई साई साई हैं।। ३७ ।।
नाथ पंथ के गंगागीरजी गुण साईके गाते हैं।
शिर्डी विकसित यही कहेगी साई साई साई हैं।। ३८ ।।
जिस स्‍थल बैठे पलट गया वहि घंटि मँगाकर बॉंधी है।
‘द्वारकामाई’ बोले साई – सुवर्णक्षण वह साई है।। ३९ ।।
साई आये यहीं रह गये स्‍वर्ग भूमिपर उतरा है।
अक्षयजागृत धुनी भी गाती साई साई साई हैं।। ४० ।।
घंटा बजकर याद दिलाती यह जमीन संतों की है।
अद्वय अनुभव देनेवाले साई साई साई हैं।। ४१ ।।
मानव ही है जाति धरापर सेवा सच्‍चा धर्म है।
“सत्‍य धर्म का पालन जीवन” साई साई साई हैं।। ४२ ।।
घंटा की ध्‍वनि सोऽहं, सोऽहं अंदर देव जगावत है।
दृष्टि प्रेम की यही दिखाती साई साई साई हैं।। ४३ ।।
यहीं बैठकर साई शिवजी कृपा बॉंटते आये है।
शुद्ध सत्‍त्‍व का सागर साई, साई साई साई हैं।। ४४ ।।
जब साई जी भोजन करते कुत्‍ते रोटी लेते हैं।
कौए लेते कौर हाथ से प्रसाद साई साई हैं।। ४५ ।।
साई हँसकर जूठा खाना प्रेम भाव से खाते हैं।
जिसने देखा मधुर दृश्‍य वह साई साई साई हैं।। ४६ ।।
सारी दुनिया है ईश्‍वर की भेदाभेद क्‍यों मन में है?
जो कोई हमसे बातें करता साई साई साई हैं।। ४७ ।।
किसे विठोबा किसे दाशरथि किसे कन्‍हैया भाता है।
उसी रूप में पाता दर्शन साई साई साई हैं।। ४८ ।।
शिरडी को जब लाते बाबा कृपाहस्‍त ही रखते हैं।
उन्‍नति का तो रहस्‍य सुंदर साई साई साई हैं।। ४९ ।।
सगुण है साई, निर्गुण साई स्थिर अस्थिर सब साई है।
अनादि साई अनंत साई, साई साई साई हैं।। ५० ।।
साईकृपा से साई चिंतन मन में प्रतिपल होता है।
शिरडी पहुँचा मन से भी वह साई साई साई हैं।। ५१ ।।
राम कृष्‍ण हरि जप है प्‍यारा साई स्‍वरूप कहते हैं।
सोऽहं मय जीवन जो करते साई साई साई हैं।। ५२ ।।
भाव चाहिये विशुद्ध कोमल गंगा यमुना ऑंसू हैं।
अंत:स्‍थल की शिरडी में स्थित साई साई साई हैं।। ५३ ।।
अक्‍कलकोट के स्‍वामी साई माणिकप्रभु भी साई है
दासगणू के सद्गुरु साई, साई साई साई हैं।। ५४ ।।
नील गगन में उडती चिडियॉं चहक भी उनकी साई है।
उपवन में जो फूल खिले हैं खुशबू उनकी साई है।। ५५ ।।
भूला भटका आए पथपर साई मॉं की इच्‍छा है।
सरल पंथपर लानेवाले साई साई साई हैं।। ५६ ।।
कभी किसी का दिल न दुखाना साईजी का कहना है।
आत्‍मतत्‍त्‍व, चेतना ईश्‍वरी साई साई साई हैं।। ५७ ।।
साई नाममें जो है शक्ति साईभक्‍तही जानत है।
आत्‍मा का बल नित्‍य बढाता साई साई साई हैं।। ५८ ।।
प्रसाद दे दो हम को साई याचक बनकर आए हैं।
हमें भी दानी जो कर पाता साई साई साई हैं।। ५९ ।।
मस्‍तकपर जो सफेद कपडा मन धवलित करता है।
गौरवर्ण श्रीसाई तन का तन को पुलकित करता है।। ६० ।।
मंदिर साई, मस्जिद साई गिरिजाघर भी साई है।
भक्‍त है, साई प्रभु भी साई, साई साई साई हैं।। ६१ ।।
निर्मल तन हो, निर्मल मन हो यह छोटी सी आशा है।
शरणागत अनुतप्‍त है गाता साई साई साई हैं।। ६२ ।।
ना मॉंगू मैं सोनाचॉंदी शुद्ध ज्ञान की प्‍यास है।
हाथ पीठपर फिरे सर्वदा साई साई साई हैं।। ६३ ।।
यों ही रोता यों ही चिढता, विकार राजा जैसा है।
आधिपत्‍य मिट जाए उसका साई साई साई हैं।। ६४ ।।
साई भाषण, साई चिंतन, साई भोजन लगता है।
साई निद्रा साई जागृति साई साई साई हैं।। ६५ ।।
जन्‍म मरण की चिंता जाए, भक्ति ही जीना लगता है।
चरणभक्तिका प्रार्थी गाता साई साई साई हैं।। ६६ ।।
इन षड्रिपुसे लडते लडते जीव अकेला थकता है।
कृपादान इसलिए मॉंगता साई साई साई हैं।। ६७ ।।
दत्‍तगुरु श्रीसाईनाथजी जिस गाने में भाव है।
गानकला मैं वही मॉंगता साई साई साई हैं।। ६८ ।।
पढना-लिखना साई साई सुनना–कहना साई है।
विचार करना ध्‍यान करना साई साई साई हैं।। ६९ ।।
दुख में साई सुख में साई प्राणोंसे भी सन्निध हैं।
श्‍वास श्‍वास में भासित होता साई साई साई हैं।। ७० ।।
पॉंच घरों की भिक्षा काफी बाकी सब बकवास है।
सुख में दुख में हँसते जीना साई साई साई हैं।। ७१ ।।
जहॉं बैठॅूं वहॉं लगे समाधि और नहीं कुछ मॉंगत है।
यह तन्‍मयता, मन की शुचिता साई साई साई हैं।। ७२ ।।
श्रीनारायण जय नारायण साई साई साई हैं।
वासुदेव हरि । पांडुरंग हरि। साई साई साई हैं।। ७३ ।।
साई नाम का अमृत पीकर कोमलता वाणी में है।
लोहे का सोना जिसने बनाया साई साई साई हैं।। ७४ ।।
मीरा मधुरा मनमें गावत साईकृष्‍ण बलिहारी है।
राधाधरमधुमिलिंद साई, साई साई साई हैं।। ७५ ।।
इस फकीर को देख अमीरी पदस्‍पर्श को झुकती है।
निर्मोही श्‍वेतांबर साई, साई साई साई हैं।। ७६ ।।
देहदु:ख को दूर भगावत करुणाघन श्रीसाई है।
आत्‍मसौख्‍य का दूध पिलाती मैया साई साई हैं।। ७७ ।।
साई मुकुंद भक्‍त गोपियॉं शिरडी तो वृंदावन है।
श्रद्धा की मुरली है गाती साई साई साई हैं।। ७८ ।।
राम रघुराई श्री साई कृष्‍ण कन्‍हैया साई है।
झनननन बजकर झॉंजभी गाती साई साई साई हैं।। ७९ ।।
मधुर मधुर बजकर शहनाई साई गुणको गाती है।
झूम झूम कर रागिणि गावत साई साई साई हैं।। ८० ।।
श्रीपाद श्रीवल्‍लभ यतिवर साई साई साई हैं।
नृसिंह सरस्‍वति सद्गुरु साई, साई साई साई हैं।। ८१ ।।
कुंडलिनी जगदंबा साई दशा उन्‍मनी साई है
राधा का पागलपन साई, साई साई साई हैं।। ८२ ।।
मैं हूँ साई, तू है साई, सब कुछ साई साई है।
विश्‍व व्‍यापकर शेष रहे वह साई साई साई हैं।। ८३ ।।
साई मैया हमें खिलाती तृप्‍तभाव से देखत है।
हमें हँसाकर आप है हँसती साई साई साई हैं।। ८४ ।।
कृष्‍णनाथ वह, रामनाथ वह, दत्‍तनाथ वह साई है।
आदिनाथ वह, ज्ञाननाथ वह, साई साई साई हैं।। ८५ ।।
साई शशि तो हम चकोर हैं दर्शन को तरसाते हैं।
अरुणोदय जो हुआ हृदय में साई साई साई हैं।। ८६ ।।
अंगुलि छूते सिहर है उठता माला का मणि साई है।
ऑंसू साई, स्‍वेद भी साई, अलख निरंजन साई है।। ८७ ।।
सोऽहं हंसारूढ है साई, गौरी शंकर साई है।
भवबंधमोचक साईनाथजी साई साई साई हैं।। ८८ ।।
लक्ष्‍मी साई, दुर्गा साई, सरस्‍वती भी साई है।
नर भी साई नारी साई, साई साई साई हैं।। ८९ ।।
ध्‍यान है साई, गान है साई सूर-ताल-लय साई है।
गति है साई, स्थिरता साई, साई साई साई हैं।। ९० ।।
साई रक्षा करो हमारी, सॉंस सॉंस में साई है।
जोर जोर से बजती ताली साई साई साई हैं।। ९१ ।।
मच्छिंद्र साई, गोरक्ष साई गहिनी साई साई है।
शिव है साई शक्ति साई साई साई साई हैं।। ९२ ।।
आदि है साई, अंत है साई मध्‍य भी साई साई है।
अनादि साई, अनंत साई साई साई साई हैं।। ९३ ।।
विवेक साई, संयम साई, विरक्ति साई साई है।
दयाक्षमाधृति शांति साई, साई साई साई हैं।। ९४ ।।
जो कोई मिलता साई लगता – भूतमात्र में साई है।
भेदबुद्धिको त्‍यज देनेपर साई साई साई हैं।। ९५ ।।
साईचिंतन है दुखभंजन मनका रंजन होता है।
ज्ञान का अंजन यह दिखलाता साई साई साई हैं।। ९६ ।।
इसी देह में साई सद्गुरु मोक्षस्थितिभी देते है।
अंगुलि धरकर धीरे चलते साई साई साई हैं।। ९७ ।।
दीप दीप में पानी भर कर साई ज्‍योत जलाते हैं।
तेजालंकृत द्वारकामाई साई साई साई हैं।। ९८ ।।
सीमापर आटा जो डाला पीडा कोसों भागी है।
भ‍क्‍तोंका सच्‍चा रखवाला साई साई साई हैं।। ९९ ।।
कुत्‍ते को भी रोटी खिलायी तृप्‍त साईजी होते हैं।
आत्‍मा सबका एक ही है वह साई साई साई हैं।। १०० ।।
प्रेम दया समता है साई, श्रद्धा सबुरी साई है।
कॉंटों में खिलनेवाला वह फूल भी साई साई है।। १०१ ।।
समाधिसुख देते हैं साई कायापालट करते है।
भाव देखकर प्रसन्‍न होते साई साई साई हैं।। १०२ ।।
संतस्‍पर्शसे पावनभूमि शिरडी काशी लगती है।
उपासनी की सद्गुरुमूर्ति साई साई साई हैं।। १०३ ।।
तव चरणों पर रखकर माथा भक्‍त प्रार्थना करता है।
एकरूप सब संत हैं होते साई साई साई हैं।। १०४ ।।
माणिकप्रभु , शिरडी के साई, स्‍वामी समर्थ एकही है।
दत्‍तराजसम त्रिमूर्ति लगती साई साई साई हैं।। १०५ ।।
कल्‍याण निष्‍ठा का ही फल है निष्‍ठा प्रभु की देन है।
श्रद्धासे हरिको भजता वह साई साई साई हैं।। १०६ ।।
साई मेरी पूर्ण कामना हुई आपकी किरपा है।
इसी स्‍तवन में देंगे दर्शन, साई साई साई हैं।। १०७ ।।
गायक श्रीराम श्रोता श्रीराम साई भी श्रीराम है।
आत्‍मनिवेदन हुआ कृपासे साई साई साई हैं।। १०८ ।।

शिरडीनिवासी श्रीसाईनाथ महाराज की जय

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

लेखनकाल २६.३.१९७६ से ३१.३.१९७६